Pimpri Chinchwad Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड हादरले! सासऱ्यानेच केला मुली समान सुनेवर बलात्कार, पतीसमोरच घडली धक्कादायक घटना

Bhosari Police: पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर तिच्याच सासऱ्याने नवऱ्यासमोर बलात्कार केला. ऐवढ्यावर न थांबता आरोपींनी तिला वेश्या व्यवसायामध्ये ढकलले. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Priya More

गोपाल मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमध्ये महिलेवर सासऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. विवाहित महिलेवर तिच्या सासऱ्याने तिच्या नवऱ्याच्या सहमतीने बलात्कार केला. ऐवढ्यावर न थांबता आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड हादरले. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसरी येथे राहणाऱ्या महिलेवर तिच्या सासऱ्याने नवऱ्यासमोरच बलात्कार केला. एकदा नाही तर आरोपी वारंवार महिलेवर बलात्कार करत होता. या घटनेतील नराधम नवरा आणि सासरा एवढेच करून थांबले नाही तर त्यांनी पीडित विवाहित महिलेची डेटिंग ॲपवर बनावट प्रोफाइल तयार करून तिला वेगवेगळ्या पुरुषांसोबत वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले.

महिलेने देहविक्रीचा व्यवसाय करण्यासविरोध केल्यानंतर तिला तिचा नवरा आणि सासर्‍याने अमानुषपणे मारहाण केली. विवाहित महिलेने या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तर तिला तिच्या सासूने मुलांसोबत घराबाहेर काढले त्यामुळे महिला आता बेघर झाली आहे. या प्रकरणात पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून भोसरी पोलिस ठाण्यामध्ये तिचा नवरा आणि सासऱ्याविरोधात बलात्काराचा आणि बळजबरी देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'माझ्यावर झालेल्या अन्याय विरोधात मला शासनाने तात्काळ न्याय मिळवून देऊन दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.', अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. सध्या ही महिला न्याय मिळावा यासाठी भीक मागत आहे. या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. भोसरी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

Maharashtra Live News Update: मुंबईच्या अंधेरी MIDC परिसरात सीप्ज कंपनीला भीषण आग

Oracle Layoff: कामावर येऊ नका; एका रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढलं | VIDEO

Toll Price Hike: प्रवास महागला! महाराष्ट्रातील टोलच्या दरात मोठी वाढ, आता किती पैसे मोजावे लागतील ?

एकनाथ शिंदेंनी पहिला डाव टाकला, शिवसेनेत वेगवान हालचाली; श्रीकांत शिंदेंसह ३९ नेत्यांवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT