Pimpri-Chinchwad News Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpri-Chinchwad : चाकण हादरलं! लग्नाच्या ५ महिन्यानंतर विवाहितेची आत्महत्या; नणंद, सासूकडून छळ

Pimpri-Chinchwad News : वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजे असताना पिंपरीमधून आणखी एक हुंडाबळीची घटना समोर आली आहे. एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून लग्नाच्या ५ महिन्यानंतर आत्महत्या केली.

Yash Shirke

गोपाळ मोटघरे, साम टीव्ही, प्रतिनिधी

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी पोलिसांनी वैष्णवीच्या सासरच्या मंडळीला अटक केली आहे. हुंड्यापायी वैष्णवीचा जीव गेला असे म्हटले जात आहे. हुंडाबळीचे हे प्रकरण ताजे असताना पुण्यातून अशीच एक घटना उघडकीस आली आहे. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिंपरी तालुक्यातील म्हाळुंगे येथे सदर घटना घडली. पूजा निर्वळ या २२ वर्षीय विवाहित महिलेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. महिलेच्या मृत्यूप्रकरणी तिचा पती गजानन निर्वळ आणि नणंद राधा यांच्या विरोधात छळ केल्याप्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लग्न झाल्यानंतर पाचव्या महिन्यातच पूजाने आत्महत्या केली होती. दुचाकी घेण्यासाठी ५० हजार रुपये दिले नाही म्हणून छळ केल्याचा आरोप पूजाच्या माहेरकडच्यांनी केला आहे. आमच्या मुलीची आत्महत्या झाली नसून तिची आत्महत्या झाल्याचेही तिच्या नातेवाईकांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

२२ वर्षीय पूजा निर्वळने एका महिन्यापूर्वी आत्महत्या केली होती. हुंडाबळीचा गुन्हा दाखल करुन सुद्धा अजूनही आरोप मोकाट फिरत आहेत. घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला असूनही आरोपी फरार असल्याने पोलिसांचा हलगर्जीपणा उघड झाल्याचे म्हटले जात आहे. तर दुसऱ्या बाजूला गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार, जालन्यात तगडा पोलीस बंदोबस्त

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम जुन्नरमध्ये, शेतक-यांचा बाजार बंद

Success Story: बीटेक केलं, नंतर UPSC केली क्रॅक; थेट मुख्यमंत्र्यांना लग्नाचं आमंत्रण देणाऱ्या IPS चंदना दीप्ती आहेत तरी कोण?

Eknath Shinde: शिवसेनेच्या नेत्यांना मनोज जरांगेंवर बोलण्यास मनाई; गुप्त बैठकीत एकनाथ शिंदेंचा मंत्र्यांना आदेश

Navpancham Rajyog: 100 वर्षांनी गणेश चतुर्थीला बनला नवपंचम राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाईम होणार सुरु

SCROLL FOR NEXT