Amar Mulchandani Arrested By ED: Saam Tv
मुंबई/पुणे

Seva Vikas Sahakari Bank Scam Case: सेवा विकास सहकारी बँक घोटाळा प्रकरण, माजी उपमहापौर अमर मुलचंदानींना अखेर ईडीकडून अटक

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pimpari Chinchwad News: पुण्यातल्या पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात (Seva Vikas Sahakari Bank Scam Case) अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी ईडीने बुधवारी व्यावसायिक आणि माजी उपमहापौर अमर मुलचंदानी यांना अटक (Amar Mulchandani Arrested By ED) केली. सेवा विकास सहकारी बँकेत तब्बल 429.6 कोटी रुपयांचा कर्ज गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी येथील सेवा विकास सहकारी बँकेतील आर्थिक अफरातफर प्रकरणाचा ईडीकडून कसून तपास सुरु आहे. या प्रकरणात ईडीने अखेर अमर मुलचंदानी यांना अटक केली. अमर मुलचंदानी यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना ७ जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे. अमर मुलचंदानीने बँकेतील सार्वजनिक ठेवींना वैयक्तिक जामीन ग्राह्य धरले आणि बँकिंग नियमांचे उल्लंघन करीत ठराविक कर्जदारांना बेकायदेशीरपणे कर्ज मंजूर केले होते. याप्रकरणी ईडीने मुलचंदानी यांची मालमत्ता याआधीच जप्त केली आहे.

सेवा विकास सहकारी बँकेतील कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने याआधीच अमर मुलचंदानी, विवेक अरान्हा, सागर सुर्यवंशी, खेमचंद भोजवानी यांच्याविरोधात कारवाई केली होती. ईडीने या सर्वांच्या कुटुंबातील 121.81 कोटी रुपयांच्या 47 स्थावर मालमत्ता आणि 54.25 लाख रुपयांच्या जंगम मालमत्ता जप्त केल्या होत्या. 2002 च्या पीएमएल कायद्यांतर्गत तरतुदीच्या आधारे ईडीने ही कारवाई केली होती.

दरम्यान, संयुक्त निबंधकांनी (ऑडिट) संपूर्ण सेवा विकास सहकारी बँकेचे ऑडिट करण्यात आले होते. या ऑडिटमध्ये 124 एनपीए कर्ज खात्यांमध्ये 429.6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार आणि अफरातफर झाल्याचे उघड झाले होते. त्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह कर्ज लाभार्थी आणि बँक व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आरबीआयने बँकेचा परवाना देखील रद्द केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT