Banner of Thackeray Brothers: अखंड महाराष्ट्राच्या हितासाठी "ठाकरे बंधुंनी" एकत्र यावं; मुंबईनंतर पुण्यात झळकले बॅनर्स

Uddhav Thackeray and Raj Thackeray: गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
Uddhav Thackeray Vs Raj Thackeray
Uddhav Thackeray Vs Raj Thackeraysaam tv
Published On

Pune News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रसेमध्ये फूट पडली आहे. राष्ट्रवादीत झालेल्या या उलथापालथीनंतर राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. विशेषत: ठाकरे बंधुंच्या भूमिकेकडे राज्यातील लोकांचं लक्ष आहे. कारण दोन दिवसांपासून राज्यात ठाकरे बंधुंनी एकत्र यावं अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

मुंबई आणि ठाण्यानंतर आता पुण्यात सुद्धा "ठाकरे बंधूनी एकत्र यावे" अशा मजकुराचे फ्लेक्स (Raj and Uddhav Thackeray Flex) लावण्यात आले आहे. पुणे शहरातील अनेक परिसरात हे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. यावर बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो एकत्र लावण्यात आले आहेत. त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्राचा मोठा नकाशा आणि हुतात्मा स्मारक लक्ष वेधून घेत आहेत. तमाम मराठी जनतेसाठी ठाकरे बंधूनी एकत्र यावे, हीच ती वेळ आहे, अशी मागणी या फ्लेक्समधून कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. (Maharashtra Politics)

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray
Maharashtra NCP Crisis: अजितदादांच्या बैठकीआधी शरद पवारांनी खेळली नवी चाल; राष्ट्रवादीचे आमदार परत येणार?

राज ठाकरे लवकरच भूमिका स्पष्ट करणार?

याआधी मुंबईत शिवसेना भवानासमोर देखील कार्यकर्त्यांनी बॅनर्स लावले होते. या बॅनर्सवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन कार्यकर्त्यांकडून करण्यात आले होते. याबाबत राज ठाकरे यांना प्रश्न विचारला तेव्हा त्यानी मी लवकरच सभा घेऊन भूमिका स्पष्ट करेल अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे ठाकरे बंधू कार्यकर्त्यांच्या या मागणीकडे कसे पाहतात हे पाहावं लागणार आहे. (Latest Political News)

Uddhav Thackeray Vs Raj Thackeray
Maharashtra NCP Crisis: अमोल मिटकरी जितेंद्र आव्हाडांवर संतापले; म्हणाले, शरद पवार फक्त...

"एकदा राज साहेब ठाकरेंना आजमावून बघा"

नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी होर्डिंगबाजी करण्यास सुरुवात केली आहे. नाशिकमध्ये कार्यक्रत्यांनी एकदा राज साहेबांना आजमावून पाहा अशा आशयाचे बॅनर्स लावले आहेत. या बॅर्सवर 'आजपर्यंत सगळ्यांना अनुभवलं हाती काय लागलं? अजूनही वेळ गेली नाही. पुन्हा एकदा राज साहेब ठाकरेंना आजमावून बघा',असे आशय असलेले होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. महाराष्ट्राला एकच पर्याय राज साहेब ठाकरे असे देखील या बॅनर्सवर लिहिले आहे. नाशिकच्या मनसे कार्यालयाबाहेर मनसे पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी देखील केली आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com