Maharashtra NCP Crisis: अमोल मिटकरी जितेंद्र आव्हाडांवर संतापले; म्हणाले, शरद पवार फक्त...

दोन्ही गटांमध्ये राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या फोटोवरून वाद रंगल्याचं पहायला मिळतंय.
Maharashtra NCP Crisis
Maharashtra NCP CrisisSaam TV
Published On

NCP Crisis: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या शिंदे गटाप्रमाणे बंड केलं आहे. राष्ट्रवादीचे देखील आता शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झालेत. अशात या दोन्ही गटांमध्ये राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या फोटोवरून वाद रंगल्याचं पहायला मिळतंय. (Maharashtra Political News)

अजित पवार समर्थकांनी अनेक ठिकाणी बॅनरवर शरद पवरांचे देखील फोटो वापरले आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या या बंडाला शरद पवारांची साथ आहे का? असा संभ्रम सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला. मात्र यावरुन शरद वपारांनी आपले फोटो वापरणाऱ्यांना सूचक इशारा दिला.

Maharashtra NCP Crisis
Prajakta Gaikwad Politics Rumors: अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने घेतली मुख्यमंत्र्यांची ‘ग्रेट भेट’; राजकारणात जाणार का? चर्चांना उधाण

मात्र तरी देखील काही ठिकाणी अजित पवारांच्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो वापरल्याचं दिसून आलं. त्यावरुन आमदार जितेंद्र आव्हड चांगलेच भडकले. पवारांचा फोटो वापरण्यावर त्यांनी अक्षेप घेतला. पवारांचे फोटो वापरणाऱ्या अजित पवार समर्थक गटावर आव्हाडांनी टीकास्त्र सोडलं होतं. त्यावरुन अमोल मिटकरींनी आता पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.

खासगी मालमत्ता नाही

जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर देताना आमदार अमोल मिटकरींनी म्हटलं की, "शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांची खासगी मालमत्ता नाही आहेत. शरद पवार सर्वांचे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी अशी वक्तव्ये करू नयेत." अशा शब्दांत अमोल मिटकरींनी खडसावलं आहे.

Maharashtra NCP Crisis
Maharashtra Political Crisis: अजित पवार गटाविरोधात शरद पवार कोर्टात जणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

शरद पवारांनी आपल्या फोटोवर स्वत: स्पष्टपणे सांगितल्यानंतर देखील महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शरद पवारांचा फोटो वापरला होता. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं की, "जिवंत माणूस जेव्हा सांगतो, माझे फोटो वापरायचे नाहीत. तर, विषय संपला. तुमच्याकडे आहेत, ना तुमचे राष्ट्रीय नेते दिल्लीचे वगैरे. त्यांचे फोटो वापरा. शरद पवार कशाला पाहिजेत?", असा सवाल करत आव्हाडांनी अजित पवार समर्थकांना खडसावलं होतं.

फोटोवर शरद पवारांची प्रतिक्रिया

“मी ज्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आणि जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनीच आमचे फोटो वापरावे. ज्यांनी आमच्या विचारसरणीचा विश्वासघात केला, त्यांनी माझा फोटो वापरू नये. माझा फोटो कुणाला वापरू द्यायचा, हा माझ्या हयातीत तरी माझाच निर्णय आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com