Maharashtra Political Crisis: अजित पवार गटाविरोधात शरद पवार कोर्टात जणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Latest Political News: आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बाजूने आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
Jayant Patal
Jayant Patalsaam tv
Published On

NCP Political Crisis: अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडले आहेत. दोन्ही गटांकडून आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला जात आहे. एवढंच नाही तर आता पक्षातील पदांवरून आणि शाखा कार्यालयांवरून देखील दोन्ही गटातील वाद समोर येत आहे.

याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता, त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्याचे काही कारण नाही, आमचा पक्ष व्यवस्थित चाललाय अशी प्रतिक्रिया दिली आहे.

काही कोर्टात जाण्याचे कारण नाही - जयंत पाटील

जयंत पाटील म्हणाले, चंद्रचूड साहेबांचा निकाल वाचा. पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे हे आपल्या लक्षात येईल. शरद पवार जोपर्यंत मला बाजूला व्हायला सांगत नाही तोपर्यंत मला बाजूला जाण्याचा अधिकार नाही असे जंयत पाटील म्हणाले.

बंडखोरांवर कायदेशीर कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला तेव्हा जंयत पाटील म्हणाले, कोर्टात जाण्याचे काही कारण नाही. आमचा पक्ष व्यवस्थित चालला आहे. महाराष्ट्राची जनता आमच्या बाजूने असल्याने कोर्टात जाण्याचा प्रश्न नाही, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

Jayant Patal
Maharashtra Politics: महाविकास आघाडी एकत्र लढणार? काँग्रेसची भूमिका स्पष्ट; आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

'53 पैकी नऊ आमदारांवर कारवाई केली'

जयंत पाटील म्हणाले, 53 पैकी नऊ आमदारांवर आम्ही कारवाई केली आहे. उरलेले जितके आमदार आहेत ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते आमच्या बरोबर आहेत. त्यांना आता वेगवेगळ्या लोकांनी संकटात आणू नये, प्रलोभन दाखवू नये आणि दबाव आणू नये, असेही जंयत पाटील म्हणाले.

'सर्व आमदारांना परत येण्याची इच्छा'

जयंत पाटील यांनी सांगितले की, बहुतेक सर्व आमदार आहेत, त्यांना परत येण्याची इच्छा आहे. काही लोक तसेच रहावे अशा भूमिकेत आम्हाला दिसत आहेत. महाराष्ट्राचे कार्यकर्ते आणि आमदार उद्या एक वाजता बैठकीला एकत्र दिसतील असा मला विश्वास आहे असेही ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते हे शरद पवार यांच्या मार्गदर्शनासाठी आज मुंबईत येत आहेत. पवार साहेबांना किती पाठिंबा आहे ते उद्या आपल्याला यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कळेल. आमची नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी आहे, अलीकडे जी झाली ती नोशनल पार्टी आहे, त्या पार्टीने मला निलंबित केलं काय आणि ठेवलं काय, मी शरद पवार यांच्या पार्टीचा अध्यक्ष आहे. त्यामुळे अशा कोणत्याही पार्टीच्या निर्णयाबद्दल मला काही फरक पडत नाही, असे देखील जयंत पाटील म्हणाले. (Tajya Marathi Batmya)

Jayant Patal
Rohit Pawar Tweet: रोहित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे? नव्या ट्विटमुळे चर्चेला उधाण

शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांमध्ये असंतोष

जयंत पाटील म्हणाले, 'ज्यामुळे आम्ही बाळासाहेबांची शिवसेना सोडली तीच कारण पुन्हा एकदा आमच्या समोर आणून तुम्ही ठेवलीत अशा प्रकारचा असंतोष एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांमध्ये आहे. आपल्या जिल्ह्यात ज्यांना विरोध केला त्यांनाच कॅबिनेट मंत्रिपद मिळाले अशी स्थिती काहींसोबत घडली आहे. त्यामुळे हळूहळू त्यांचा असंतोष बाहेर येईल, असे देखील जयंत पाटील म्हणाले. (Latest Political News)

शरद पवारांचा दौरा झंझावाती असेल

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, शरद पवार साहेब आमचे नेते आहेत आणि त्यांच्या सांगण्यावरून आम्ही आलो आहोत असे सांगून जर कोणी सर्वांना बोलवत असेल तर त्याबद्दल मला काही बोलायचे नाही. साताऱ्याच्या दौऱ्यात पवार साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. थोड्या दिवसात नाशिक, बीड, अहमदनगर, सोलापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये पवार साहेब दौरा सुरू करणार आहेत आणि हा झंझावाती दौरा असेल. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com