Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर

Washim Samruddhi Expressway Accident News : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात उभ्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत २ चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर १ जण जखमी आहे. चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Washim Samruddhi Expressway Accident Saam Tv
Published On
Summary
  • समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण ट्रक अपघात

  • २ चालकांचा जागीच मृत्यू, १ जखमी

  • १०८ व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेकडून तात्काळ मदतकार्य

  • कारंजा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू, पोलीस तपास जारी

मनोज जैसवाल, वाशीम

समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सतत सुरु असून समृद्धी महामार्ग हा चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. काल वाशिममध्ये समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तसेच जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिमच्या कारंजा तालुक्यात समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Sangli : 'सगळ्यांना हाणलं नाही तर...' आव्हान खरे ठरले; जयंत पाटील यांचा ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम

मृतांपैकी एक जण उत्तर प्रदेशातील जनकपुर येथील आहे,तर दुसरा बुलढाणा जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन, शेलुबाजार 108 समृद्धी महामार्ग येथून अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना घेऊन कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Accident : समृद्धी महामार्गावर ट्रकचा भीषण अपघात; २ जणांचा जागीच मृत्यू, एकाची प्रकृती गंभीर
Today Winter Temprature : राज्यात थंडीचा पारा घसरला! कमाल तापमानात वाढ; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ स्नेहलता चव्हाण यांनी दोन जखमीना मृतक घोषित केले आणि जखमी झालेल्या रुग्णावर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले. या घटनेनें परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com