School Students Poisoned After Eat Sandwich Saam Tv
मुंबई/पुणे

Pimpari Chinchwad News : शाळेतील सँडविच खाल्ले, विद्यार्थ्यांना चक्कर; अनेकांची प्रकृती बिघडली, पालक चिंतेत!

School Students Poisoned After Eat Sandwich: शाळेमध्ये सँडविच खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. पिंपरी चिंचवडच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये ही घटना घडली.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवडमधील शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील शाहूनगरच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये आज सकाळी ही घटना घडली. विद्यार्थ्यांना ब्रेड आणि चटणी खायला देण्यात आली होती. याच ब्रेड आणि चटणीतून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असं स्कूल प्रशासनाचे म्हणणं आहे. काही विद्यार्थ्यांची प्रकृती खूपच खराब झाल्यामुळे त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहूनगरच्या डी वाय पाटील स्कूलमध्ये आज फूड सेशन आजोजित करण्यात आले होते. या फूड सेशनमध्ये विद्यार्थ्यांना खायला सँडविच देण्यात आले होते. पण सँडविच खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला. याच सँडविचमधून विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना उलटी, मळमळसारखे वाटू लागले तर काही विद्यार्थ्यांना भोवळ येऊ लागली आहे.

सँडविच निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे डी वाय पाटील स्कूलच्या प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पालकांनी शाळेमध्ये धाव घेतली. काही विद्यार्थ्यांना जास्त प्रकृती खराब झालयामुळे रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Married Life: वैवाहिक जीवन यशस्वी करायचं , 'या' सवयीचा अवलंब करा..

SCROLL FOR NEXT