Payal Zambre death case saam tv
मुंबई/पुणे

Pune: पायल झांबरे प्रकरणात मोबाईल ठरणार मोठा पुरावा, चौथा कोण? पतीसह तिघांची कोठडी वाढवली

Payal Zambre death case: पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पती अक्षय झांबरेसह सासू आणि सासऱ्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. पायल यांचा मोबाईल तपासला जाणार असून पोलिसांनी झांबरे कुटुंबीयांकडून ३५ तोळे सोनं जप्त केलं आहे.

Surabhi Jayashree Jagdish

पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आलीये. पायलचा मोबाईल फोन तपासण्यासाठी आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाला वेग दिलाय. दरम्यान या प्रकरणातील पती अक्षय झांबरेसह तिघांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आलीये. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता तिघांना ९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत राहावं लागणार आहे.

पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात पती अक्षय झांबरे, सासू मंगल झांबरे आणि सासरे अरविंद झांबरे यांना अटक करण्यात आली आहे. आज तिघांची पोलीस कोठडी संपल्याने पुणे पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केलं होतं. यावेळी पोलिसांनी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली. पायलचा मोबाईल फोन तपासायचा आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची चौकशी करायची आहे. याशिवाय फरार असलेल्या चौथ्या आरोपीचा शोध घ्यायचा आहे, अशी कारणे पोलिसांनी न्यायालयात दिली.

पोलिसांच्या या मागणीनंतर न्यायालयाने अक्षय झांबरेसह तिघांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

तपासात ३५ तोळे सोनं जप्त

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी झांबरे कुटुंबीयांकडून ३५ तोळे सोनं जप्त केलं आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. स्वारगेट पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

काय आहे पायल झांबरे आत्महत्या प्रकरण?

पुण्यातील स्वारगेट परिसरातील मुकुंदनगरमध्ये ३४ वर्षीय पायल अक्षय झांबरे हिने २ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रसिद्ध व्यावसायिक अरविंद झांबरे यांच्या कुटुंबातील सून होत्या. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित छळाला कंटाळून पायल यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पायल यांचा भाऊ ऋषिकेश रवींद्र पवार यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून पती अक्षय झांबरे, सासू मंगल अरविंद झांबरे (वय ५८), सासरे अरविंद झांबरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पायल यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी सर्वप्रथम पती अक्षय झांबरे याला अटक केली. त्यानंतर सासू मंगल आणि सासरे अरविंद झांबरे यांनाही अटक करण्यात आली. आता या प्रकरणात पायल यांचा मोबाईल फोन तपासल्यानंतर कोणती नवी माहिती समोर येते आणि फरार चौथ्या आरोपीचा शोध कधी लागतो याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'जर एकत्र यायचं असेल तर आम्हाला,....'; दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: येवल्यात भंगार गोदामाला भीषण आग

Lakshmi Pujan Wishes : लक्ष्मीपूजनाला प्रियजनांना पाठवा हे खास शुभेच्छांचे मेसेज; लक्ष्मीपूजन होईल आणखी खास

Skin Care Routine : फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून चेहऱ्याची काळजी घेण्याकरिता या टिप्स फॉलो करा

आगीचा तांडव! भंगाराच्या गोडाऊनसह 4 घरं जळाली, परिसरात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT