आगीचा तांडव! भंगाराच्या गोडाऊनसह 4 घरं जळाली, परिसरात खळबळ|VIDEO

Yeola Scrap Godown Massive Fire Latest News: नाशिकच्या येवला शहरातील अंबिया शहा कॉलनीत भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीने शेजारील चार घरांनाही वेढले असून, मनमाड आणि निफाडसह विविध ठिकाणच्या अग्निशमन दलांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिकच्या येवला शहरातील अंबिया शहा कॉलनी परिसरात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या परिसरातील भंगाराच्या गोडाऊनला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले असून, शेजारीच असलेल्या चार घरांनाही आगीने वेढले आहे. त्यामुळे परिसरात एकच धावपळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आगीची तीव्रता मोठी असल्याने आग विझवण्यासाठी नागरिकांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मनमाड, निफाड यांसह अन्य ठिकाणच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत गोडाऊनसह चार घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.