Mumbai local train: कानफाटात मारली अन् धावत्या ट्रेनमधून उडी मारली इतक्यात...! व्हिडिओ व्हायरल

Mumbai local train fight: मुंबईच्या चर्चगेट-विरार फास्ट लोकलमध्ये प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दरवाजात उभं राहण्यावरून झालेल्या वादानंतर एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Mumbai local train
Mumbai local trainsaam tv
Published On: 

मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. चर्चगेटहून विरारच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकलमध्ये गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादादरम्यान एका प्रवाशाने चालत्या ट्रेनमधून उडी मारली. सुदैवाने त्यावेळी ट्रेन मुंबई सेंट्रल स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरून जात होती. ट्रेनचा वेग कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.

ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्यावरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेनच्या दरवाजात उभं राहण्यावरून दोन प्रवाशांमध्ये वाद झाला. सुरुवातीला झालेल्या शाब्दिक वादाचं काही वेळातच हाणामारीत रूपांतर झालं. दोघांमध्ये चालत्या लोकलमध्ये जोरदार मारामारी सुरू झाली. दरम्यान हा सुरु असानाच एकाने ट्रेनमधून थेट खाली उडी मारली आणि तो पळून गेला.

Mumbai local train
Mega Block : ऐन सणासुदीत प्रवाशांचे मेगा हाल! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या प्रकारामुळे लोकलमधील इतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतोय. व्हिडिओमध्ये लोकल ट्रेनमध्ये दोन प्रवासी एकमेकांशी मारामारी करताना दिसत आहेत

मुंबई लोकलमध्ये आधीच मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यात प्रवाशांमध्ये होणारे वाद आणि हाणामारीच्या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतंय. या घटनेमुळे पुन्हा एकदा लोकलमधील प्रवाशांची सुरक्षा आणि रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Mumbai local train
Sharad Pawar Health Update: शरद पवारांना रूग्णालयातून डिस्चार्ज; आता प्रकृती कशी आहे?

काही महिन्यांपूर्वी लोकलमध्ये चाकूने वार करून तरुणाची हत्या

मुंबई लोकलमधील मारामारीची ही पहिलीच घटना नाही. काही महिन्यांपूर्वी लोकल ट्रेनमध्ये चाकूने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. मयंक लोहार असं मृत तरुणाचं नाव होतं.

त्या दिवशी जोरदार पाऊस सुरू होता. पावसाचं पाणी लोकल ट्रेनच्या आत येत होतं. याचदरम्यान दरवाजा बंद करण्यावरून मयंक लोहार आणि आरोपीमध्ये वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर आरोपीने रागाच्या भरात आपल्या बॅगेतून चाकू काढला आणि मयंकवर हल्ला केला. या हल्ल्यात मयंकचा मृत्यू झाला.

Mumbai local train
बॉलीवूडमध्ये दहशत माजवणाऱ्या बिश्नोई गँगला हादरा! टॉप कमांडरला अटक

या घटनेनंतर आता पुन्हा एकदा लोकल ट्रेनमधील प्रवाशांमधील वाद आणि मारामारीचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.