mumbai local mega block  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Megablock: प्रवाशांनो कृपया लक्ष असू द्या! रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक

Latest News: उपनगरीय रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) घेण्यात येणार आहे.

Priya More

Mumbai News: लोकलने प्रवास (Local Travel) करणाऱ्या मुंबईकरांसाठी (Mumbaikar) महत्वाची बातमी आहे. रविवार जर तुम्ही काही कामानिमित्त घराबाहेर पडणार असाल तर रेल्वेचे वेळापत्रक (Train Timetable) पाहून घराबाहेर पडा. कारण रविवारी मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे रुळाच्या दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी हा मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) घेण्यात येणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी म्हणजेच रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावरील माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी / वांद्रे या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकलचे वेळापत्रक पाहून तुम्ही घराबाहेर पडला तर तुम्हाला गर्दीचा सामना करावा लागणार नाही.

असा असेल मध्य रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक (Central Railway Line Mega Block) -

रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 11.05 वाजल्यापासून ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील.

या लोकल सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर या लोकल मुलुंड स्थानकावरुन परत धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

तर, ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा या रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन या स्थानकांवर थांबतील. या लोकल पुढे अप धिम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. या लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.

असा असेल हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक (Harbour Railway Line Mega Block) –

रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर देखील मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी 11.16 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलकरीता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 वाजल्यापासून ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द राहतील.

तसंच, पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 वाजल्यापासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील लोकलसेवा रद्द राहतील. तर गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 वाजल्यापासून ते सायंकाळी 5.13 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

महत्वाचे म्हणजे, या मेगाब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना या मेगाब्लॉक कालावधीमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरुन प्रवास करण्याची परवानगी असेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates : अकोल्यातील प्रभाग ३ मध्ये २५ ते ३० लोकांचे मतदार यादीतून नाव गायब

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, बोगस मतदानाचा आरोप, मुंबईच्या १४६ क्रमांच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

राजकीय संघर्ष पेटला! काँग्रेस उमेदवाराचे कार्यालय जाळले, भाजपवर आरोप|VIDEO

Spa Centre : २० मुलींसोबत एकच मुलगा, स्पा सेंटरमध्ये नको तो धंदा, मसाज सर्व्हिसच्या नावाखाली...

Hidden Place In Palghar : मुंबईजवळील हे हिडन प्लेस तुम्हाला माहीती आहे का? फोटोग्राफी आणि निसर्गप्रेमींसाठी प्रसिध्द

SCROLL FOR NEXT