PM Modi Threat: कोची दौऱ्याआधीच पंतप्रधान मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; केरळमध्ये हायअलर्ट जारी

PM Narendra Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी दोन दिवसीय केरळमधील कोची दौऱ्यावर जाणार आहे.
PM Modi Threat
PM Modi ThreatSaam tv
Published On

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २४ एप्रिल आणि २५ एप्रिल रोजी दोन दिवसीय केरळमधील कोची दौऱ्यावर जाणार आहे. या कोची दौऱ्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर केरळमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, येत्या २४ आणि २५ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय मध्य प्रदेश आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वात आधी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यानंतर दक्षिणेतील केरळ राज्यात जाणार आहे.

पुढे सूरत आणि त्यानंतर दमनच्या रस्त्याने सिल्वासा येथे जाणार आहे. सिल्वासा येथील दौरा झाल्यावर दिल्लीत परतणार आहे. या दौऱ्यादरम्यान पीएम नरेंद्र मोदी यांच्या ८ कार्यक्रमाचा सामावेश असणार आहे. तसेच या दौऱ्यादरम्यान ७ वेगवेगळ्या शहराचा दौरा करणार आहे.

मोदींना जीवे मारण्याची धमकी

पीएम नरेंद्र मोदी हे २४ एप्रिल रोजी केरळ दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी हे रोडशो करणार आहेत. तसेच एका जाहीर सभेत लोकांना संबोधित करणार आहे.

या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर केरळमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांना धमकवणारं पत्र पाठवण्यात आलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धमकावणाऱ्याने २४ एप्रिल रोजी कोचीदरम्यान आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली आहे. या पत्रात धमकी देणाऱ्या व्यक्तीने त्याचं नाव आणि पत्ता असा संपूर्ण तपशील दिला आहे. या धमकी प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई करण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.

PM Modi Threat
Amit Shah On Satya Pal Malik : राज्यपाल असताना सत्यपाल मलिक गप्प का बसले? अमित शहांचा थेट सवाल

दरम्यान, पोलिसांनी तपास घेऊन आरोपीच्या घरी पोहोचताच तो भयभीत झाला. त्याने कोणत्याच प्रकारचे धमकीपत्र न दिल्याचे सांगितले. कोणीतरी मुद्दामून पत्रात माझं नाव लिहिल्याचा त्याने दावा केला आहे. या धमकी प्रकरणानंतर पोलिसांनी बस स्थानक, रेल्वे स्थानक आणि विमानतळावर तपासणी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com