Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक, पोलिसात तक्रार दाखल करत केली अटकेची मागणी!

Latest Political News: या वक्तव्याप्रकरणी भाजपने आव्हाडांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MID Police Station) तक्रार दाखल केली आहे.
jitendra Awhad News
jitendra Awhad NewsSaam TV
Published On

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांविरोधात (NCP Leader Jitendra Awhad) भाजप आक्रमक झाली आहे. जितेंद्र आव्हाडांनी रामनवमी (Ramnavmi) आणि हनुमान जयंतीच्या (Hanuman Jayanti) मिरवणुकींसंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप (BJP) कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. या वक्तव्याप्रकरणी भाजपने आव्हाडांविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात (MID Police Station) तक्रार दाखल केली आहे. तसंच त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

jitendra Awhad News
Sanjay Raut On Eknath Shinde: 'अनेक जण लायकी नसतानाही मुख्यमंत्री होतात...', संजय राऊतांचा एकनाथ शिंदेवर घणाघात!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून घाटकोपरमध्ये शुक्रवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सभा पार पडली. या सभेमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी 'रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकांमध्ये दंगली होतात.', असे विधान केले होते. त्यांच्या या विधानामुळेच भाजप आक्रमक झाली आहे.

jitendra Awhad News
Amitabh Bachchan Viral Tweet : 'तू चीज बडी है Musk Musk..', अमिताभ बच्चन यांना ट्विटरवर 'ब्लू टिक' परत मिळालं

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये भाजपाने तक्रार दाखल केली आहे. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी त्यांनी असे सांगितले की, 'जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंतीची शोभा यात्रा हिंदुस्थानमध्ये नाही काढणार तर काय पाकिस्तानमध्ये साजरी करणार का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

jitendra Awhad News
Sharad Pawar : काळ संघर्षाचा आहे जागं रहावं लागेल; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

तसंच, 'जितेंद्र आव्हाडांविरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी.' अशी मागणी करत 'जर हिंदू धर्माच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांनी सतत अपमान सुरू ठेवले तर ते जिथे दिसतील तिथे आम्ही त्यांचे चप्पलांनी स्वागत करु.', असा इशारा तेजिंदर सिंग यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com