Navi Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

Navi Mumbai: नवी मुंबई एअरपोर्टपर्यंतचा प्रवास होणार सुसाट, ४ पदरी पूल बांधणार; कसा असणार प्लान?

Panvel Municipal Corporation to make Bridge over Gadhi River Bridge: पनवेल महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता गाढी नदीवर एक चार पदरी पूल बांधण्यात येणार आहे.

Siddhi Hande

नवी मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

पनवेलमधील गाढी नदीवर बांधणार नवीन चार पदरी पूल

पनवेल आणि करंजाडे जोडले जाणार

पनवेल महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय काढला आहे. आता शहरातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि वाहतूक कोंडीपासून सुटका म्हणून नवीन पुल बांधणार येणार आहे. पनवेल महानगरपालिकेने करंजाडे सांडपाणी पंपिग स्टेशनजवळ गाढी नदीवर पुल बांधण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मागणीनंतर प्रस्तावाला मंजुरी

पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी या वाहतूक कोंडीपासून नागरिकांची सुटका व्हावी, यासाठी हा प्रस्ताव मांडला होता. पनवेल, करंजाडे आणि वडघरच्या सिडको वसाहतींमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना रोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागयचा. यावर समस्येवर प्रकाश टाकण्यात आला. त्यानंतर पनवेल महापालिका आयुक्तांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

करंजाडे पुलावर होतेय सर्वाधिक वाहतूक

महापालिका अधिकाऱ्यांच्या मते, करंजाडेकडे जाणाऱ्या पुलावर नेहमी वाहतूक कोंडी होते. हा रस्ता नेहमी वाहनांनी भरलेला आहे. दरम्यान, आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरु झाल्यावर या मार्गावर वाहतूक वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा नवीन पनवेल करंजाडे महामार्गावरील नवीन पूल महत्त्वाचा आहे.

खर्च

पवनेल करंजाडेला जोडणाऱ्या या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. आता लवकरच या प्रकल्पाचे बांधकाम सुरु होईल. या प्रकल्पासाठी ४८.४० कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली.

पुल कसा असणार?

मंजुर केलेल्या आराखड्यानुसार, हा पूल चार पदरी असणार आहे. २४० मीटर लांबी आणि २१.५ मीटर रुंदी असणार आहे. हा पूल पनवेल महानगरपालिकेच्या पूर्वेकडील ४० फूट रुंदीच्या रस्त्याच्या पश्चिमेकडील करंजाडे रोडकडे जाणाऱ्या सिडकोच्या रस्त्याशी जोडणार आहे.यामुळे सिडको वसाहतीतील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत मनसेची महत्वाची बैठक

Winter Health Tips: थंडीमध्ये कमी पाणी प्यायल्याने होतील हे ५ गंभीर आजार

Accident Viral Video : माणुसकी हरपली...! नवले पुलावर ८ जणांनी प्राण सोडले, दुसरीकडे लोक दागिने आणि पैसे गोळा करण्यात गुंग, व्हिडिओ व्हायरल

Byculla Incident : मुंबईत इमारत बांधकामादरम्यान मोठी दुर्घटना; दोन कामगारांचा मृत्यू

Alia Bhatt: दुबईतील आलिया भट्टचा सिझलिंग लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT