Pune Metro : पुणेकरांचा नेम नाही, मेट्रोमध्ये केले प्री वेडिंग शूट, नंतर...

pune metro pre-wedding shoot without permission पुण्यातील एका जोडप्याने परवानगी न घेता मेट्रोमध्ये प्री-वेडिंग शूट केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मेट्रो प्रशासनाने कपल आणि फोटोग्राफरवर दंडात्मक कारवाई केली आहे.

Pune Metro Pre-Wedding Shoot : पुण्यातील एका जोडप्याने परवानगी न घेता थेट मेट्रोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट केले आहे. फोटोशूटचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटोशूट समोर आल्यानंतर त्यांच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

मेट्रोमध्ये फोटोशूट करणे जोडप्याला आणि फोटोग्राफरला चांगलेच महागात पडले आहे. मेट्रो प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेतील एका व्यक्तीने थोडीफार रिस्क घेणं वाईट नही, असे म्हटले आहे. परंतु यानंतर त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले. पुणे मेट्रोच्या नियमांनुसार, व्यावसायिक किंवा कोणत्याही विशेष फोटोशूटसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. पण या कपलने अथवा फोटोग्राफरने परवानगी घेतलीच नाही. त्यामुळ आता कारवाई झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com