

ठाणेकरांसाठी दिलासादायक बातमी
घोडबंदर महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
२०२६ जानेवारीमध्ये होणार सुरु
प्रताप सरनाईकांची घोषणा
नवी मुंबई, कोकण, अहमदाबाद कनेक्ट होणार
ठाणेकरांची आता वाहतूक कोंडीपासून सुटका होणार आहे. आता बहुप्रतिक्षित घोडबंदर हायवे लवकरच सुरु केला जाणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये हा हायवे सुरु केला जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे आता घोडबंदरवरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. तुम्ही अवघ्या काही मिनिटांत या हायवेवरुन जाऊ शकतात.
नवीन वर्षात सुरु होणार घोडबंदर महामार्ग (Ghodbunder Highway Innauagration Date)
घोडबंदर परिसरात नेहमी वाहतूक कोंडी असते. तासनतास वाहने एकाच जागेवर उभी असतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. दरम्यान, आता या घोडबंदर महामार्गामुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमची मिटणार आहे.
घोडबंदर महामार्ग जानेवारी २०२६ मध्ये सुरु होईल. तोपर्यंत सर्व प्रलंबित कामे पुर्ण केली जातील. यामुळे मुख्य रस्त्यावरील प्रवास सुरळीत होणार आहे, असं परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहेत.
गुजरात, उत्तर महाराष्ट्र, कोकणाला जोडणार
ठाणे शहरातून हा घोडबंदर महामार्ग जाणार आहे. हा हायवे मुंबई ईशान्य, पश्चिम उपनगरे गुजरात, उत्तर महाराष्ट्र, नवी मुंबई आणि कोकण या प्रमुख प्रदेशांना जोडला जाणार आहे. त्यामुळे हा प्रवास एकदम सुसाट होणार आहे. घोडबंदरवरुन थेट मुंबईत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात
ठाणे शहराच्या हद्दीत महामार्गाची दुरुस्ती केली जात आहे. दोन्ही मार्गांच्या लेन मुख्य कॅरेजवेमध्ये विलीन केल्या जात आहेत. या महामार्गाच्या काँकिटिकरणाचे काम सुरु आहे. यामुळे लेन बंद आहेत. यामुळे शहरातून बाहेर जाण्याची वाहतूक कोंडी होत आहे.
प्रताप सरनाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामात गायमुख विभागातील पुनर्बांधणी, सर्व्हिस रोडचे रुंदीकरण, पाण्याची पाईपलाइन टाकणे तसेच वीजवाहिन्यांचे स्थलांतर याचा समावेश आहे. वाहतूक पोलिस सामाजिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून पुनर्बांधणी आणि उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम करतील, जेणेकरुन प्रवाशांना त्रास होत नाही. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महानगरपालिकेकडे सोपवेल. यानंतर हा महामार्ग प्रवाशांसाठी सुरु होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.