ना सिग्नल, ना ट्रॅफिक; मुंबईतून थेट २५ मिनिटांत गाठा ठाणे, प्रकल्प कधी पूर्ण होणार? वाचा सविस्तर

Mumbai-Thane Elevated Road: MMRDAच्या प्रकल्पाअंतर्गत चेंबूरमधील छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंद नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. यामुळे ठाणे ते दक्षिण मुंबई प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होईल.
Mumbai-Thane Elevated Road
Mumbai-Thane Elevated RoadGoogle
Published On

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत चेंबूरमधील छेडा नगर ते ठाण्याच्या आनंद नगरपर्यंत उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प २,६८२ कोटी रूपयांचा असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ठाणे ते दक्षिण मुंबईमधील प्रवास फक्त ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे.

एमएमआरडीएने सिग्नलमुक्त प्रवासासाठी इस्टर्न फ्रीवेचा विस्तार करण्याची योजना आखली. या योजनेअंतर्गत छेडा नगर ते आनंद नगर (ठाणे) असा उन्नत मार्ग बांधण्यात येणार आहे. हा मार्ग सुमारे १३.१० किमीचा असल्याची माहिती आहे. सध्या इस्टर्न फ्रीवे हा मानखूर्दला संपतो. नवीन विस्तारानुसार हा मार्ग छेडा नगरपासून सुरू होतो. घाटकोपर, रमाबाई नगर, विक्रोळी, कांजूरमार्ग, जेव्हीएलआर, एरोली आणि मुलुंडमार्गे ठाण्यातील आनंद नगर येथे संपेल.

Mumbai-Thane Elevated Road
आजीसोबत झोपलेल्या ४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण; बलात्कार करून रक्ताच्या थारोळ्यात सोडलं, भाजपचा ममता सरकारवर हल्लाबोल

हा मार्ग पुढे साकेत प्रकल्पातील मुलुंड ऑक्ट्रोय नाकापर्यंत जोडला जाणार आहे. यामुळे मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा प्रवासही अधिक जलद होईल. एकूण ६ लेन असणाऱ्या या प्रकल्पाची लांबी १३.९० किमी असणार आहे. तसेच रूंदी २५ मीटर असणार आहे.

ठाण्याहून दक्षिणेकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्राधिकरणाने मुलुंड चेक नाका, ऐरोली जंक्शन आणि विक्रोळी जंक्शन येथे २ लेनचे अप आणि डाऊन रॅम्प प्रस्तावित आहेत. यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर होईल.

Mumbai-Thane Elevated Road
कल्याण डोंबिवलीकरांवर पाणी कपातीचे संकट! 'या' दिवशी १२ तास पाणी येणार नाही, कारण काय?

या प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण आणि टेस्ट पाइलिंगचे काम पूर्ण झालंय. पूर्व द्रुतगती महामार्गावरील सुमारे ७०० झाडांवर परिणाम होणार असल्यानं मुंबई महापालिकेनं नोटिसा जारी केल्या आहेत. आतापर्यंत या प्रकल्पाचे सुमारे ५.३८% प्रत्यक्ष काम पूर्ण झालंय. या प्रकल्पाबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले की. 'Mumbai in Minutes, या उपक्रमांर्गत आम्ही शहरातील कनेक्टिव्हिटी सुधारण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दक्षिण मुंबई ते ठाणे साकेत प्रवास केवळ २० ते २५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे वाहतूक कोंडी देखील कमी होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com