

कोलकातामध्ये एका निष्पाप मुलीचे अपहरण केल्यानंतर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा ४ वर्षांची चिमुकली आपल्या आजीसोबत झोपली होती. तिचे नराधमांनी अपहरण केले. तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. घटनेच्या दिवशी चिमुकली आपल्या आजीसोबत तारकेश्वर रेल्वे शे़डमध्ये मच्छरदाणीखाली एका खाटेवर झोपली होती. हल्लेखोरांनी मच्छरदाणी कापून मुलीचे अपहरण केले. दुसऱ्या दिवशी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली.
घटनेबाबत आजी म्हणाली, 'चिमुकली माझ्यासोबत झोपली होती. पहाटेच्या सुमारास कुणीतरी तिला घेऊन गेले. जेव्हा मला ती सापडली, तेव्हा ती नग्न अवस्थेत होती. आमची घरे पाडली गेली म्हणून आम्ही रस्त्यावर राहत आहोत. आता आम्ही कुठे जायचं?', असं म्हणत आजीनं टाहो फोडला.
चिमुकली पहाटेच्या सुमारास गायब झाली. नंतर ती दुपारी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. मुलीला गंभीर अवस्थेत तारकेश्वर ग्रामीण रूग्णालयात पाठवले. तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी या एफआयआर नोंदवला आहे.
दरम्यान, भाजपने ममता बॅनर्जी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते सुवेंद्र अधिकारी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. 'तारकेश्वरमध्ये एका ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला. घटनेनंतर कुटुंब न्यायासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. पण एफआयआर नोंदवण्यात आला नाही. पीडितेला रूग्णालयात नेण्यात आले. पण तिला चंदननगरमध्ये रेफर करण्यात आलं. तारकेश्वर पोलीस गुन्हा दडपण्यात व्यस्त आहेत. सत्य दडपले जात आहे', असा हल्लाबोल त्यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.