70 वर्षांचा मित्र तुटला, तेल महागलं, रशियाने केली भारताची नाकेबंदी

India Russia Oil Discount Ended Crude Price Impact: भारताला अमेरिकाधार्जिणी भूमिका चांगलीच महागात पडलीय. कारण अमेरिकेमुळे भारताचा 70 वर्षांचा मित्र दुरावला... आणि याच दुरावलेल्या मित्राने भारताला खिंडीत गाठलंय.. ते नेमकं कसं? आणि दुरावलेल्या मित्रामुळे भारताचं तेल किती महागलंय ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Oil storage tanks at a refinery as global crude prices surge amid geopolitical tensions and shifting India-Russia energy ties.
Oil storage tanks at a refinery as global crude prices surge amid geopolitical tensions and shifting India-Russia energy ties.Saam Tv
Published On

अमेरिका-इस्त्रायल आणि इराणचे मध्यपूर्वेतील एकमेकांच्या तेल डेपोंवर हल्ले सुरु आहेत...त्यामुळे भारताला होणारा तेल पुरवठाही विस्कळीत झालाय... एवढंच नाही तर जागतिक बाजारात तेलाचे दर दुप्पट म्हणजेच 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचलेत....याच दरम्यान अमेरिकेनं पुन्हा भारताला रशियाकडून तेल खरेदीस परवानगी दिली.....मात्र याच अमेरिकाधार्जिण्या भुमिकेमुळे भारताची कोंडी झालीय....कारण 70 वर्षांच्या मैत्रीपोटी भारताला तेल खरेदीत दिलेली सूट रशियाने रद्द केल्यानं आता बाजार भावाप्रमाणेच भारताला तेल खरेदी करावी लागणार असल्याचं वृत्त रॉयटरने दिलंय...

खरंतर 2021 पर्यंत भारत रशियाकडून फक्त 1 ते दीड टक्केच तेलाची आयात केली जात होती.. मात्र रशिया युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपिय देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले... त्यावेळी रशियाने भारताला तेल खरेदीत घसघशीत सूट दिली आणि भारतानं मोठ्या प्रमाणात रशियातून तेल खरेदी सुरु केली...2025 मध्ये भारतानं एकूण तेल खरेदीच्या गरजेपैकी 35.8 टक्के तेल खरेदी एकट्या रशियाकडून केली..या खरेदीवर जानेवारी 2026 मध्ये 13 डॉलर प्रति बॅरल इतकी सूट दिली जात होती... मात्र अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला... याच दबावातून भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केली... फेब्रुवारी 2026 मध्ये फक्त 19.3 टक्के इतकंच तेल रशियाकडून खरेदी केलं... त्यामुळे 70 वर्षांचा मित्र भारतापासून दुरावला. आता रशियन तेल ब्रेंट क्रूड ऑईलपेक्षा 5 डॉलरने महाग खरेदी करावं लागण्याची शक्यता

भारताने तब्बल 70 वर्षे आपली स्वायत्ततेसह रशियासोबतची मैत्री जपली.... रशियानेही अनेकदा भारताला मदत केली... आता अमेरिकाधार्जिण्या धोरणामुळे 70 वर्षांचा मित्र नाराज झाला... त्यानंतरही मध्य पूर्वेतील युद्धामुळे भारतापुढं तेल संकट उभं ठाकण्याची चिन्हं असतानाच नाराजी विसरुन रशिया तेल पुरवठा वाढवण्यास तयार असल्याचे संकेत रशियन मिशनच्या उपप्रमुखांनी दिलेत...

मात्र आता ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 103 डॉलरवर गेल्यानं भारताला रशियातून मिळणारं तेल 108 डॉलर प्रति बॅरल इतकं महाग मिळू शकतं.... त्यामुळे रशियासोबतच भारतापुढं कोणते पर्याय आहेत? पाहूयात...

अमेरिकेतील तेल हे 101 डॉलर प्रति बॅरल आहे.. मात्र त्याची वाहतूक महाग पडू शकते

व्हेनेझुएलामधून तेल खरेदीचा वाहतूक खर्च जास्त आहे... त्यामुळे तेलाची किंमत वाढू शकते...

आफ्रिकन देशांकडून तेल खरेदीचा पर्याय आहे.. मात्र लाल समुद्रातील तणावामुळे लांबचा मार्ग अवलंबल्यास तेलाचा वाहतूक खर्च वाढू शकतो.

आता मुद्दा आहे तो भारताला परवडणाऱ्या दरात तेल मिळवण्याचा.... अमेरिकेनं महिनाभराची सवलत दिल्यानंतर भारतानं कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचं ठणकावलय... मात्र ही कणखर भूमिका रशियन तेल आयातीत कपात करण्याआधी घेतली असती तर आखाती देशतील युद्धाच्या प्रसंगातही भारताला रशियाकडून परवडणाऱ्या दरात तेल मिळालं असतं, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com