Panvel-Karjat Local Saam Tv
मुंबई/पुणे

Panvel-Karjat Local: पनवेल-कर्जत लोकल कधीपर्यंत सुरू होणार? प्रवासाचा वेळ आणि खर्च किती?

Panvel-Karjat Suburban Railway Corridor: मुंबई रेल्वे विकास महामंडळ म्हणजे एमआरव्हीसीच्या वतीने एमयुटीपी ३ अंतर्गंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू आहे. या मार्गावर लवकरच लोकलसेवा सुरू होणार असल्यामुळे नागरिकांना त्याचा चांगला फायदा होईल.

Priya More

पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरचे काम खूपच वेगाने सुरू आहे. या कॉरिडॉरचे काम ७० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २९.६ किमी लांबीच्या या पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉरसाठी तब्बल २,७८२ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळ म्हणजे एमआरव्हीसीच्या वतीने एमयुटीपी ३ अंतर्गंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम सुरू आहे.

२०२१ नंतर काम सुरू -

कर्जत आणि पनवेलमधील प्रवाशांसाठी व्हाया ठाणे किंवा कुर्लामार्गे लोकलने प्रवास करावा लागतो. या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना रस्ते मार्गाने प्रवास करण्यासाठी खूपच वेळ घालवावा लागतो. त्याचसोबत रस्ते मार्गाचा प्रवास जास्त खर्चक देखील आहे. त्यामुळेच पनवेल ते कर्जत अशी थेट लोकल सुरु करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर यासाठी नवीन उपनगरीय रेल्वे मार्ग बनविण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयुटीपी ३ अंतर्गंत घेतला. कोरोनामुळे या प्रोजेक्टची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामे देखील खोळंबली होती. पण जानेवारी २०२१ नंतर या कामांना सुरूवात झाली.

असा असेल प्रोजेक्ट -

सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास १ तास ५० मिनिटांचा होणार आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २,७८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पनवेल ते कर्जत दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उद्दिष्ट आहे.

प्रवाशांना होणार फायदा -

महत्वाचे म्हणजे पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरवरून लोकल ट्रेन चालवण्यासाठी प्राथमिक वेळापत्रक देखील तयार करण्यात आले आहे. या मार्गासाठी १२ डब्यांच्या ३ लोकल गाड्या आरक्षित करण्यात आल्या आहेत. या गाड्या दिवसभर धावणार आहेत. हा नवीन मार्ग दोन जुन्या स्थानकांना जोडण्यात येणार आहे ज्यामध्ये उपनगरातील सर्वात मोठी बोगदा आणि पुलाचा देखील समावेश आहे. याआधी या मार्गावर मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या. पण आता नव्या दुहेरी मार्गिकेमुळे आता पनवेलमार्गे कर्जतपर्यंत लोकल ट्रेन धावू शकणार आहेत. त्यामुळे कर्जत, पनवेल भागामध्ये राहणाऱ्यांचा प्रवास सोपा आणि सुसाट होणार आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे वैशिष्ट्ये -

- पनवेल- कर्जत अंतर - २९.६ किमी

- एकूण खर्च - २,७८३ कोटी रुपये

- स्थानके - पनवेल, चिखले, मोहोपे, चौक, कर्जत

- रस्ते उड्डाणपूल - ५

- बोगद्यांची संख्या - ३

- रेल्वे उड्डाणपूल - २

- मुख्य पूल - ६

- लहान पूल- ३७

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT