Mumbai Local News: मुंबईच्या महिला लोकल डब्यात मोबाईलचा स्फोट, धुराचे लोट आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण

Mumbai Local: कळवा रेल्वे स्थानकावर महिलांच्या लोकल रेल्वे डब्यात एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला होता. रेल्वे पोलीस कर्माचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
Mumbai Local News
Mumbai Local NewsSaam Tv News
Published On

मुंबईतील ठाणे येथे महिला प्रवाशाच्या लोकल डब्यात मोबाईलचा स्फोट झालाय. १० फेब्रुवारीला रात्री ८:१२ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शनपर्यंत लोकल ट्रेन जात होती. दरम्यान कळवा रेल्वे स्थानकावर महिलांच्या लोकल रेल्वे डब्यात एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला होता. घटनास्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी तातडीने दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली.

सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, 'सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मोबाईल फोनचा ब्लास्ट झाल्यामुळं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटामुळे महिला रेल्वे डब्यात धूर पसरला होता. धूर पाहताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच अग्रिशामक यंत्राचा वापर करून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

Mumbai Local News
Plane accident: विमानतळावर २ विमानांची टक्कर, एकाचा मृत्यू, ४ जण जखमी; विमानाचा झाला चकणाचूर

आग विझवण्यात आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे पोलीस कर्माचाऱ्यांना यश मिळाले. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर रेल्वे डब्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं.

Mumbai Local News
Kolhapur News: परीक्षा देऊन घरी येताना काळाचा घाला, ऊसाचा ट्रॅक्टर अंगावरून गेला; कोल्हापुरात हळहळ

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, स्फोट घडला असल्याचा आवाज आला. स्फोटामुळे महिलांचा रेल्वे डबा धुराने भरला होता. ज्यामुळे रेल्वे डब्यातून उतरण्यासाठी प्रवासी दाराच्या दिशेने धावले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या महिलेचा मोबाईल फुटला त्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनेची चौकशी सुरू आहे. बॅटरीची समस्या किंवा इतर काही तांत्रिक कारणांमुळे मोबाईल फोनचा ब्लास्ट झाला असावा. सार्वजनिक ठिकाणी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरताना प्रवाशांनी काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com