GAURI GARJE DEATH MYSTERY: SUICIDE OR MURDER? FAMILY ACCUSES FOUL PLAY saam tv
मुंबई/पुणे

पंकजा मुंडेंच्या PA अनंत गर्जेच्या मुसक्या आवळल्या, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी कारवाई

Why Was Anant Garje Arrested in Gauri Palwe Case : मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात वरळी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे.

Namdeo Kumbhar

  • गौरी पालवे मृत्यू प्रकरणात कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यावर खून केल्याचा आरोप करत गुन्हा नोंदवला.

  • यानंतर वरळी पोलिसांनी मध्यरात्री एक वाजता अनंत गर्जे यांना अटक केली.

  • अनंत गर्जे यांनी सर्व आरोपांचे खंडन केले.

  • पोलिसांकडे काही महत्त्वाचे पुरावे असल्याचे बोलले जाते.

Anant Garje Arrested in Gauri Palwe Case: मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे याला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री एक वाजता गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे. पत्नी गौरीच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गौरी गर्जे यांचा मृतदेह घरात आढळला होता. तिच्या कुटुंबियांकडून अनंत गर्जे याच्यावर हत्या केल्याचा आरोप केला होता.

गौरी पालवे आत्महत्याा प्रकरणात रविवारी राज्यात संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. गौरी हिच्या कुटुंबियांनी वरळी पोलिसांत अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला होता. पोलिसांनी २४ तासात अनंत गर्जे यांना बेड्या ठोकल्या आहेत. गौरीच्या कुटुंबियांनी खूनाचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली असून तपासाला वेग आला आहे. घटनेची सत्यता शोधण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे.

अनंत गर्जे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्यावरील आरोपाचे खंडन केले होते. तर गौरीच्या कुटुंबियांकडून अनंत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ही आत्महत्या नाही, तिला मारलेय, असा आरोप त्यांना केला होता. त्याशिवाय अनंतर गर्जे याच्याविरोधात पुरावे असल्याचाही आरोप केला होता. दुसरीकडे मंत्री पंकजा मुंडे यांनी योग्य ती कारवाई कऱण्यात यावी, असेही म्हटले होते. अनंत गर्जे याला मध्यरात्री एक वाजता अटक कऱण्यात आली आहे. वरळी पोलिसांकडून अनंत गर्जे याची चौकशी करण्यात येत आहे. गौरीच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे? याचा तपास केला जात आहे.

२ फेब्रुवारी २०२५ रोजी डॉ. गौरी पालवे आणि अनंत गर्जे यांचं थाटामाटात लग्न झालं. गौरी ही नायर हॉस्पिटलमध्ये डेंटीस्ट म्हणून काम करायची. मात्र अनंतकडून गौरीचा सातत्यानं छळ केला जात असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. तर सप्टेंबरमध्ये घर शिफ्ट करताना गौरीला घरात अनंतच्या अफेअरची काही कागदपत्रं सापडली. तिथूनच अनंतविषयी गौरीच्या मनात संशय बळावत गेला आणि त्यातूनच तिने आत्महत्या केल्याचा दावा कऱण्यात आलाय.

अनंत गर्जे काय म्हणाला ?

गौरीच्या आत्महत्येवेळी मी घरी नव्हतो. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळं २९ व्या मजल्यावरच्या रिफ्युजी एरियातील इन्हिजिबल जाळी उचकटून आपण ३० व्या मजल्यावर गेलो. तेव्हा गौरीने गळफास घेतला होता. तिला खाली उतरवून केईएमम हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मुंबईच्या प्रसिद्ध फुटबॉलपटूचा संशयास्पद मृत्यू, जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Ladki Bahin Yojana: या लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, eKYCतून समजणार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न

Local Body Election : बदलापुरात प्रचारसभेत राडा, दोन राजकीय पक्षांमध्ये जोरदार मारहाण | VIDEO

Nagpur Travel : डोंगर, दऱ्या अन् थंड वाऱ्याची झुळूक; नागपूरला गेल्यावर आवर्जून पाहा 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Pune : पुण्यात उद्यापासून वाहतुकीत मोठे बदल, कात्रज बायपासवरून जाण्याआधी ही बातमी वाचाच, अन्यथा होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT