Pune Jagdale Family Reaction On Operation Sindoor SAAM TV
मुंबई/पुणे

Operation Sindoor: त्यांनी आमचं कुंकू पुसलं, 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव योग्य; पुण्यातील जगदाळे कुटुंबियांची पहिली प्रतिक्रिया

Pune Jagdale Family Reaction On Operation Sindoor: भारताने पाकिस्तानवर काल मध्यरात्री एअर स्ट्राईक केले. या कारवाईला ऑपरेशन सिंदूर नाव दिले. यावर आता जगदाळे कुटुंबियांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Siddhi Hande

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच भारताने बदला घेतला आहे. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांना आपला जीव गमावावा लागला. या नागरिकांना आता भारताने न्याय मिळवून दिला आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले आहे. यावर आता मृत्यू झालेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

जगदाळे कुटुंबियांनी ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया दिली आहे. जगदाळे यांच्या पत्नीने सांगितले की,मला सकाळी भावाचा फोन आला. त्यानंतर मी टीव्ही लावला. त्यावर असं कळलं की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. पाकिस्तानच्या ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला आहे. यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं. ऑपरेशन सिंदूरच्या नावामध्ये लाल रंगाचे सिंदूर दिसत होते. त्यांना हे कसं सुचलं. मोदी साहेबदेखील सामान्य लोकांमधून आले आहे. आम्हाला ज्या यातना झाल्या त्या त्यांना जाणवल्या. माझ्या मुलींचं कुंकू पुसलं गेलं, असं मोदी साहेबांना वाटलं. त्यामुळेच त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं. याचा मला आनंद झाला आहे.

त्यावेळी दहशतवाद्यांनी सांगितलं होतं की, मोदी को जाके बताओ तेव्हादेखील त्यांच्यावर विश्वास होता.पुलवामावेळीदेखील असं झालं होतं. आता तुम्ही थांबू नका. त्यांना सळो की पळा करुन सोडा.माझ्या पतींचं संतोष जगदाळेंचं बलिदान वाया जावू नये, असं त्यांनी सांगितलं.

मी समाधानी आहे. परंतु पूर्ण समाधानी नाही. एक एक दहशतवादी जेव्हा संपेल तेव्हा आम्हाला पूर्ण समाधान होईल.आपला भारत खऱ्या अर्थाने दहशतवादी मुक्त होईल. तेव्हा मला समाधान होईल. यासाठी हे कार्य आता थांबू नये. नाहीतर माझ्या पतींचं बलादान वाया जाईल, असं संतोष जगदाळेंच्या पत्नीने सांगितलं.

संगीता गनबोटे आणि कुणाल गनबोटे यांची प्रतिक्रिया

पहलगाम दहशतवादी हल्ल्यांमध्ये देशातील 27 जणांचा मृत्यू झाला यानंतर काल भारताकडून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्यात आले आहे. आज पहाटे ऑपरेशन सिंदूर नावाने भारताने पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी हड्ड्यावर हल्ला केला आहे.यामध्ये काही दहशतवादी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते.यानंतर पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. असंच उत्तर अपेक्षित होतं.पाकिस्तानला याहीपेक्षा तीव्र उत्तर अजून तरी द्यावं.आम्ही आमचे घरातली व्यक्ती गमावली मात्र ऑपरेशन सिंदूर हे नाव देऊन सरकारने चांगलं काम केलं आहे त्याचं समाधान आम्हाला आहे अशा भावना व्यक्त केल्या आहेत. ऑपरे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT