Maharashtra gas shortage  Saam TV Marathi news
मुंबई/पुणे

गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक; कपडा व्यापाऱ्याला १४ लाखांचा गंडा

kalyan news : डोंबिवलीत गॅस कनेक्शन अपडेटच्या नावाखाली ऑनलाइन फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. कपडा व्यापाऱ्याला तब्बल १४ लाखांचा गंडा घातला आहे.

Vishal Gangurde

महानगर गॅसचे कनेक्शन बंद होणार सांगत व्यापारी अरुण मोरे यांची १४.४६ लाखांची फसवणूक

ऑनलाईन १२ रुपये पाठवा असा बहाणा केला, त्यानंतर खात्यातून पैसे लंपास

दोन महिलांना ‘ई-चलन’ आणि APK लिंक पाठवून ४ लाखांचा गंडा

रामनगर आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

डोंबिवलीत सायबर गुन्हेगारांनी ‘महानगर गॅसचे जुने कनेक्शन बंद होणार’ असे सांगत एका कपडा व्यापाऱ्याची तब्बल १४ लाख ४६ हजार ९८९ रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अरुण भगवान मोरे असे फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. ते डोंबिवली पूर्वेतील गोपाळनगर परिसरात कुटुंबासह राहतात.मोरे हे कपड्यांच्या विक्रीसह पेंटिंग व चायनीज पदार्थ विक्रीचा व्यवसाय करतात.

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी दिनेश जोशी नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला महानगर गॅस कंपनीचा कर्मचारी असल्याचे सांगितले. नवीन गॅस लाईन टाकण्यात येणार आहे. त्यासाठी सध्याचे कनेक्शन बंद होणार आहे. प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून १२ रुपये पाठवा, असे कर्मचाऱ्याने सांगितलं.

मोरे यांना संशय आल्याने त्यांनी कोणतीही बँक माहिती दिली नाही. तसेच त्या व्यक्तीला पुन्हा संपर्क करू नका, अन्यथा पोलिसांत तक्रार करीन, अशी तंबीही दिली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून पैसे काढल्याचा मेसेज मोबाईलमध्ये आले. वेगवेगळ्या आठ व्यवहारांद्वारे त्यांच्या खात्यातून १४ लाख ४६ हजार ९८९ रुपये काढून घेण्यात आल्याचे समोर आले. परंतु कोणताही व्यवहार केला नसतानाही मोठी रक्कम खात्यातून वळती झाली. त्यामुळे मोरे यांना मोठा धक्का बसला.

सुनीलनगर परिसरात राहणाऱ्या दोन महिलांचीही अशीच फसवणूक झाली होती. ४५ वर्षीय महिलेला गॅस कनेक्शन बंद होईल, अशी भीती दाखवत १० रुपयांचे ई-चलन भरण्याची लिंक पाठवण्यात आली होती. त्यानंतर मोबाइलवर पाठवलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर खात्यातून २ लाख ९९ हजार ५०० रुपये काढून घेण्यात आलेत. तर दुसऱ्या ५६ वर्षीय महिलेला APK लिंक पाठवली. त्या महिलेला जवळपास १ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता.

दोन्ही महिलांची सुमारे ४ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आलीये. या प्रकरणी संबंधित महिलांनी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तर व्यापारी अरुण मोरे यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अमेरिका–इराण तणावामुळे गॅस टंचाईच्या चर्चांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. सायबर चोरटे त्याचाच फायदा घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अशा प्रकारचे फोन कॉल, लिंक किंवा मेसेज आल्यास सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT