Laxman Hake Saam Tv
मुंबई/पुणे

Laxman Hake: नगरपालिका निवडणुकीत महात्मा फुलेंचाही पराभव झाला होता, लक्ष्मण हाके असं का बोलले? VIDEO

Laxman Hake On OBC Reservation: लक्ष्मण हाके यांनी नगरपालिका निवडणुकीत महात्मा फुलेंचाही पराभव झाला होता, असं वक्तव्य केलंय. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून हाके आक्रमक झाले आहेत.

Rohini Gudaghe

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

पुणे श्रमिक पञकार संघाने लक्ष्मण हाके यांचा वार्तालाप आयोजित केला होता. यावेळी लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली आहे. मराठा बाधंवांवर बेरोजगाराची वेळ आली. नोकरी नाही, याला ओबीसी आरक्षण जबाबदार नसल्याचं हाकेंनी म्हटलं आहे. मराठा समाज ओबीसीमध्ये आल्याने त्यांची परीस्थिती लगेच बदलणार नाही. ओबीसी झाले तरी गरीबी हटणार नसल्याचं हाकेंनी म्हटलं आहे.

लक्ष्मण हाके नेमकं काय बोलले?

भाजपचा डीएनए जर ओबीसी असेल, तर भाजपने ओबीसीसाठी पुढे आले पाहिजे असं आवाहन हाकेंनी केलं (Laxman Hake) आहे. लोकसभेसाठी पवार साहेबांना भेटलो होतो. त्यांच्या पक्षाकडुन उमेदवारीसाठी सकारात्मक चर्चा झाली होती. पण पुढे काय झालं माहित नाही. पुण्यात ब्रिटीश काळात नगरपालिका निवडणुकीत, महात्मा फुलेंचा पराभव झाला होता. हाकेंनी लोकसभा निवडणुकीतील परभवावरुन महात्मा फुले यांच्या पराभवाचं उदाहरण यावेळी दिलं.ज्योतिबा फुले यांना भवानी पेठमध्ये त्याकाळी केवळ २ मते पडली होती. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव देखील याच देशात झाला होता. मी तुलना करत नाही पण उदाहरण देत आहे. माझ्याकडे प्रचाराला पैसे देखील न्हवते, असं लक्ष्मण हाकेंनी स्पष्टीकरण दिलंय.

यावेळी बोलताना हाके म्हणाले की, ⁠संविधानला आव्हान देण्याची भाषा करणे योग्य नाही. राज्यातील नेते पाचही वर्ष निवडणूक (OBC Reservation) मोडमध्ये असल्यामुळे प्रश्न सुटत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. सामजिक व्यवस्था बिघडत आहे.आजही महाराष्ट्रातील ओबीसी सामजिक न्याय प्रतीक्षेत आहे. म्हणुन आम्ही वडीगोद्रित आंदोलन केले उपोषणाला बसलो असल्याचं हाकेंनी सांगितलं आहे.

यावेळी जरांगे पाटलांवर बोलताना हाके म्हटले की, अर्थसंकल्पात ओबीसींना १ टक्का पैसै देत आहेत. मग आम्हाला काय मिळालं? राज्यात एकही ओबीसी वसतीगृह नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. ⁠सरकारनं सहकारी साखर कारखान्यांना पैसै (Maharashtra Politics) दिलेत. ⁠याआधी इतर ठिकाणी अनेक ओबीसी आंदोलनं झाले. मात्र शासननाने लक्ष दिलं नाही. म्हणुन आम्ही शासनाचं (bjp) आमच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वडीगोद्रीत आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

Akola Accident : अकोल्यात रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात; उतरताना प्रवासी ट्रेन अन् फलाटाच्या फटीत अडकला

SCROLL FOR NEXT