Laxman Hake VIDEO : मराठा समाज शासनकर्ता, मनोज जरांगेंची वक्तव्ये बालिशपणाची; लक्ष्मण हाके कडाडले

Laxman Hake Vs Manoj Jarange Patil : मराठा समाज हा शासनकर्ता असून मनोज जरांगे पाटील यांची वक्तव्ये बालिशपणाची आहे, असं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
मराठा समाज शासनकर्ता, मनोज जरांगेंची वक्तव्ये बालिशपणाची; लक्ष्मण हाके कडाडले
Laxman Hake Vs Manoj Jarange PatilSaam TV

आमच्या आंदोलनासमोर ओबीसी आंदोलन उभे करून काहींचा दंगल घडवण्याचा डाव आहे, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. त्यांच्या या आरोपाला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे. मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य बालिशपणाचे आहे, असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. ते जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

ओबीसी समाजाने राज्यात कधी दंगली घडवल्या आहेत का? असा सवाल देखील हाके यांनी उपस्थित केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला जात असल्याचंही हाके यांनी म्हटलं आहे. मराठा-कुणबी एकच आहे असं म्हणणं, हा मूर्खपणा आहे. झुंडशाही करून आरक्षणाची मागणी करणे हे घटनाविरोधी आहे, अशी टीका देखील हाके यांनी केलीय.

मराठा आरक्षणविरोधातील जेव्हा सुप्रीम कोर्टातील याचिकेवरील सुनावणी सुरू होती. त्यावेळी मा न्यायमूर्तींनी देखील मराठा समाज शासनकर्ता असल्याचं निरीक्षण नोंदवलं आहे. मराठा समाज मागास नाही. त्यामुळे आतापर्यंत ४ वेळा आयोगाने मराठा आरक्षण नाकारलं आहे. ओबीसी समाज शोषित असून त्यांना फक्त पंचायतराजमध्येच आरक्षण दिलं गेलंय, असंही हाके यांनी स्पष्ट केलंय.

मराठा समाज शासनकर्ता, मनोज जरांगेंची वक्तव्ये बालिशपणाची; लक्ष्मण हाके कडाडले
Manoj Jarange VIDEO : छगन भुजबळ यांना दंगल घडवून आणायचीय, जशाच तसे उत्तर देऊ; मनोज जरांगे संतापले

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते?

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी जाहीर पत्रकारपरिषद घेऊन काही गंभीर आरोप केलेत. आमच्या आंदोलनासमोर ओबीसी आंदोलन उभे करून काहींचा दंगल घडवण्याचा डाव आहे. त्यासाठी लोक अंगावर घातली जात आहेत, असं जरांगे यांनी म्हटलंय. छगन भुजबळ वारंवार चिथावणी देत त्यांना दंगल घडवून आणायची आहे, असा आरोपही जरांगे यांनी केलाय.

मराठा समाज ५६ टक्के असून आता सावध झालं पाहिजे. भुजबळ तलवार काढण्याची धमकी देत असेल तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा देखील जरांगे यांनी जाहीर पत्रकारपरिषदेतून केला. मंत्री छगन भुजबळ यांनी तलवारी गंजल्या त्या घासून ठेवा असं विधान केलं. त्यांना दंगल घडवायची आहे का? असा सवाल उपस्थित करत मराठांनी तयार राहावे, यांनी दंगल घडवली तर माझा एकही माणूस मरता काम नये, असं विधान देखील जरांगे यांनी केलं.

मराठा समाज शासनकर्ता, मनोज जरांगेंची वक्तव्ये बालिशपणाची; लक्ष्मण हाके कडाडले
VIDEO : मुस्लिम बांधवांच्याही कुणबी नोंदी सापडल्या, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या; मनोज जरांगेंची नवी मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com