भूशी डॅम बॅक वाॅटर परिसरात रविवारी घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर आज (साेमवार) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेबद्दल खेद व्यक्त करत जिल्हाधिकारी यांनी यापुढे लाेणावळा येथे पर्यटकांना सायंकाळी सहानंतर महत्वाच्या पर्यटनस्थऴावर बंदी घातली आहे. लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली लवकरच नागरिकांपर्यंत पाेहचवली जाईल अशी माहिती दिवसे यांनी दिली.
लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याचअनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय.
याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही कारवाईचा बडगा उगारला जाईल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी दिला. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.