Satara Kelavali Waterfall : केळवली धबधब्‍यात क-हाडचा युवक बेपत्ता, शाेधासाठी शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे पथक उतरले डाेहात

youth from karad drowned in kelavali waterfall near satara: पाेलिसांना पाण्याचा अंदाज येत नसल्याने त्यांनी युवकाच्या शाेधासाठी छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांचे पथक बाेलाविले.
youth from karad drowned in kelavali waterfall near satara
youth from karad drowned in kelavali waterfall near sataraSaam Digital

सातारा शहरानजीकच्या घाट माथ्यावर दमदार पाऊस पडत आहे. यामुळे शहरानजीकचे धबधबे प्रवाहित झाले आहेत. रविवारी सातारा नजीकच्या केळवली धबधब्यात एक युवक बुडाला. या युवकांचा सातारा तालुका पोलिसांसह छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्स यांच्या पथकाकडून धबधबा परिसरात आजही शोध सुरू आहे.

सातारा शहरानजीक ठाेसघेर, कास, वज्राई, भांबवली, केळवली आदी धबधबे आहेत. हे धबधबे पाहण्यासाठी राज्यातून पर्यटक येऊ लागले आहेत. रविवारी केळवली येथील धबधबा परिसरात कराड शहरानजीकच्या सैदापूर येथील युवक बुडाल्याची माहिती पाेलिसांना मिळाली.

youth from karad drowned in kelavali waterfall near satara
Reels चा नाद पडेल भारी, करावी लागेल पाेलिस ठाण्याची वारी;कोल्हापुरात विशेष माेहिमेस प्रारंभ

पाेलिसांनी तातडीने हालचाली करुन घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांच्या समवेत आहे छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सचे पथक देखील हाेते. अंधार पडल्याने रविवारी सायंकाळी युवकाची शाेध माेहिम थांबवली. आज (साेमवार) पुन्हा युवकाचा शाेध घेण्यात येत आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार ऋषिकेश रमेश कांबळे (वय 22) असे धबधब्याच्या पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव आहे.

Edited By : Siddharth Latkar

youth from karad drowned in kelavali waterfall near satara
Dharashiv : 10 दिवसांपूर्वी झाला हाेता विवाह, पतीला पत्नीचा पाहावा लागला मृतदेह; नेमकं काय घडलं नळदुर्ग किल्ल्यात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com