Laxman Hake News  saam tv
मुंबई/पुणे

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Laxman Hake : लक्ष्मण हाके यांनी अजित पवारांची माफी मागावी अन्यथा न्यायालयात खेचणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. नितीन संजय यादव यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Vishal Gangurde

लक्ष्मण हाके यांना अजित पवारांवर केलेली शिवराळ भाषा चांगलीच भोवणार असल्याचे दिसत आहे. लक्ष्मण हाके यांना सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. कायदेशीर नोटिशीमुळे हाके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शिवराळ भाषेत अजित पवारांवर टीका केल्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा दिलाय. सूरज चव्हाण यांच्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

अजित पवार यांच्यावर टीका करतना शिवराळ भाषा वापरल्याने लक्ष्मण हाके यांच्या विरोधात सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन संजय यादव यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. लक्ष्मण हाके यांनी सात दिवसांत अजित पवार यांची लेखी माफी न मागितल्यास न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला आहे.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल होणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात चुकीच्या भाषेत टीका केल्या प्रकरणी कायदेतज्ञ ॲड.शंतनु माळशिकारे यांच्या वतीने नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना नोटीस बजावली. लक्ष्मण हाके यांनी ७ दिवसांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लेखी माफी न मागितल्यास लक्ष्मण हाके यांना न्यायालयात खेचून दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संजय यादव यांनी सांगितले आहे.

लक्ष्मण हाके काय म्हणाले होते?

लक्ष्मण हाके म्हणाले होते, 'अजित पवार आमच्या पोरांना शिकून देत नाही. $#%#खोर आमच्या महाज्योतीच्या पोरांना पैसे देत नाहीये. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, सारथीला निधी दिला जातोय. पण महाज्योतीला निधी दिला जात नाहीये. आमच्या ओबीसी मुलांवर अन्याय केला जातोय.',

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : दसऱ्याआधी सोनं स्वस्त झालं की महागले? २४, २२, १८ कॅरेटचे ताजे दर आले समोर

Surya Namaskar: १०,००० पावले, सायकलिंग किंवा जिम विसरा; 'हा' व्यायाम आहे लय भारी

Maharashtra News Live Update: अमरावती विद्यापीठात बॅटरीच्या स्फोटाने आग; तीन दुचाकी जळून खाक

Fenugreek Seeds: वजन ते शुगर कंट्रोल...; मेथीच्या दाण्यांचे हे ९ अद्भूत फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Long Hair Care Tips For Women: केसांच्या वाढीसाठी घरगुती उपाय, मेथी आणि तांदळाचा हेअर सीरम लावा

SCROLL FOR NEXT