Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Mumbai Crime news : मुंबईत १६ समलैंगिक मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
Mumbai Crime
Mumbai Crime newsSaam tv
Published On

Mumbai Crime : मुंबईत हादरवणारी घटना घडली आहे. मुंबईत दोन समलैंगिक तरुणांच्या प्रेमाचा दुर्दैवी अंत झाला. १६ वर्षीय मुलाने कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली. मात्र, १९ वर्षीय तरुणाने माझ्या १६ वर्षीय मुलाला कोल्ड ड्रिंकमधून विष दिल्याने मृत्यू झाल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. मृत मुलाच्या वडिलांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

Mumbai Crime
Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

मीडिया रिपोर्टनुसार, १६ वर्षीय मुलाच्या वडिलांनी केलेल्या खळबळजनक आरोपानंतर पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस आता फोरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत.

मृत मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटलं की, 'माझा मुलगा २९ जून रोजी फिरायला जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला. पण त्या रात्री घरी परतलाच नाही. त्यानंतर त्याची शोधाशोध सुरु केली.

Mumbai Crime
Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

दुसऱ्या दिवशी १६ वर्षीय मुलाच्या मित्राने तो त्याच्या १९ वर्षीय मित्राच्या घरी गेल्याचं सांगितलं. त्यानंतर १६ वर्षीय मुलाचे वडील त्याच्या घरी पोहोचले. त्यावेळी दोघेही बेडवर एकमेकांच्या बाजूला झोपलेले होते. त्यावेळी वडिलांनी मुलाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलगा जागा झालाच नाही. त्यामुळे वडिलांनी डॉक्टरांना बोलावून घेतलं. त्यावेळी डॉक्टरांनी १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

पोलिसांच्या तपासात समोर आलं की, 'आरोपीने पीडित मुलाला कोल्ड ड्रिंक दिलं. कोल्ड ड्रिंक प्यायल्यानंतर मुलाला उलट्या झाल्या. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलीस अद्याप फोरेन्सिक अहवालाची वाट पाहत आहेत. मुलाच्या वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Mumbai Crime
Rohtang Accident : भरधाव कार दरीत कोसळली; ४ जणांचा जागीच मृत्यू, वाहनाचा अक्षरश: चक्काचूर

तक्रारीनुसार, आरोपीने मुलाला ४ महिन्याआधी नागपूरला घेऊन गेला होता. त्याविषयी मुलाच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. रिपोर्टनुसार, पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी आरोपीपासून दूर राहण्यास सांगितलं होतं. कुटुंबीयांनी सांगितल्यानंतर दोघांनी भेटणे आणि बोलणे बंद केलं होतं. भेटणे आणि बोलणे बंद झाल्यामुळे आरोपीने मुलाची हत्या करण्याचं षडयंत्र रचल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com