Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंनी मराठीच्या विजयी मेळाव्यात युतीचे संकेत दिलेत. त्यामुळ मराठी मतदार ठाकरे ब्रँडकडे वळल्यास शिंदेसेनेचं काय होणार? असा प्रश्न निर्माण झालाय. शिंदेंच्या सेनेची अडचण का वाढणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....
Eknath Shinde
Eknath Shinde news Saam TV
Published On

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

विजयी मेळाव्यातील उद्धव ठाकरेंचं हे वाक्य भविष्यातील राजकीय घडामोडींचे संकेत देणार ठरलयं. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या दृष्टीक्षेपात फक्त महापालिका निवडणुकी नसून संपूर्ण महाराष्ट्र असल्याचं दिसतयं.

Eknath Shinde
Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

या मेळाव्यातून ठाकरे ब्रँड हा राज्यातील विरोधी पक्ष म्हणून समोर सत्ताधाऱ्यांसमोर उभा ठाकण्याची शक्यता आहे. हे जर प्रत्यक्षात घडलं तर महाराष्ट्राच्या राजकारणावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. विशेष करून शिंदेंसेनेला याचा फटका बसू शकतो का? पाहूयात

शिंदेसेनेचं काय होणार?

बाळासाहेबांची खरी शिवसेना कोणाची? यावरून जनमत बदलण्याची शक्यता

मराठी मताचं विभाजन होण्याची शक्यता

शिंदेसेनेची ताकद मुंबई आणि कोकणात कमी होण्याची शक्यता

शिंदेसेना आणि भाजपचं मराठी मतांचे ध्रुवीकरण थांबणार

मनसेचं राजकीय वजन वाढल्यानं काही मतदारसंघात शिंदेंना फटका

मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या जागा कमी होण्याची शक्यता

Eknath Shinde
Raj Thackeray : एक उल्लेख राहून गेला; राज ठाकरेंकडून सोशल मीडियावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त, कारण काय?

मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्या पक्षाची खरी ताकद निवडणुकीत कळेल, असा इशारा ठाकरे बंधूंना दिलाय.

ठाकरे बंधू एकत्र आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चुरस आणखी वाढणार आहे. त्यामुळे निव़डणुकीचा निकाल काहीही असो. मात्र मराठीच्या मुद्द्यावर मराठी माणसाला एकत्र आणण्याची ताकद फक्त ठाकरेंमध्येच आहे, हेच विजयी मेळाव्यातून सिद्ध झाल्याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com