Nitin Desai News  Instagram
मुंबई/पुणे

Nitin Desai Death Update : नितीन देसाई यांच्या जवळपास २५० कोटींच्या कर्जाचं काय होणार? कोण फेडणार कर्ज?

Nitin Desai Loan : आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध आर्ट डायरेक्टर नितीन देसाई यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली. सिनेसृष्टी, राजकीय मंडळींनी नितीन देसाईंच्या निधानावर शोक व्यक्त केला. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी एवढं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. नितीन देसाई यांच्यावर जवळपास २५० कोटींचं कर्ज असल्याची माहिती आता समोर येत आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र प्रश्न अजूनही असा आहे की नितीन देसाईचंं २५० कोटींचं कर्ज कोण फेडणार?

होम लोनसाठी नियम

नियमानुसार, कर्जदार व्यक्तीच्या निधनानंतर कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी कर्जाच्या प्रकारानुसार वेगवेगळे नियम आहेत. होम लोनच्या बाबतीत घराचे कागदपत्रे बँकेकडे तारण ठेवले जातात. यामध्ये कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास सह कर्जदारावर कर्ज फेडण्याची जबाबदारी येते. (Latest News Update)

मालमत्ता विकण्याचा पर्याय

या व्यतिरिक्त मृत व्यक्तीच्या वारसांना कर्ज फेडावं लागतं. ते देखील कर्ज फेडण्यास सक्षम नसतील तर मालमत्ता विकून कर्ज फेडण्याचा पर्याय त्यांच्यकडे असतो. बँका आता कर्जाचा विमा देखील काढतात. त्यामुळे कर्जदार व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे वसूल करण्यास मदत होते.

पर्सनल आणि कार लोनसाठी नियम

पर्सनल लोनमध्ये कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाल्यास बँका दुसऱ्या व्यक्तीकडून पैशांची वसूली करू शकत नाही. वारसांकडून कोणतीही वसूली केली जाऊ शकत नाही. कार लोनमध्ये कर्जदार व्यक्तीचा मृत्यू झाला तर वारसाना कर्ज फेडावं लागतं. जर कर्ज फेडलं नाही तर गाडी जप्त केली जाते आणि गाडी विकून कर्ज वसूल केलं जातं.

वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यास नितीन देसाई यांच्या बाबतीत त्यांचा कर्ज कोणत्या स्वरुपाचं आहे हे पाहिलं जाईल. त्यानुसार त्यांनी कर्ज दिलेली संस्था योग्य नियमानुसार कर्ज वसूल करु शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT