maharashtra Politics  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी वहिनींना विचारलं का? भाजप नेत्याने उद्धव ठाकरेंना डिवचलं

nitesh rane Latest News : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे. या युतीच्या चर्चेवर नितेश राणे यांनी भाष्य केलं.

Vishal Gangurde

महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नव्या युतीची नांदीची चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी युतीच्या वक्तव्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीला फटका बसू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरे बंधू एकत्र येण्याआधीच भाजप नेते, मंत्री नितेश राणे यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरेंसोबत जाण्याआधी रश्मी ठाकरे यांना विचारलं का? असा सवाल करत मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं.

महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी एका वृत्त वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत नितेश राणे यांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. नितेश राणे म्हणाले, 'ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे कोणाला आवडत नाहीत? अनेकांना खरं बोलणं आवडत नाही. राज ठाकरे यांची अडचण उद्धव ठाकरे यांना नसून घरातील एका सदस्याला आहे'. नितेश राणे यांनी नाव न घेता रश्मी ठाकरे यांच्यावर भाष्य केलं.

नितेश राणे पुढे म्हणाले, 'मी शिवसेनेला जवळून ओळखतो. मला सर्व काही माहीत आहे. महाविकास आघाडीदरम्यान उद्धव ठाकरे जे निर्णय घेत होते. त्या निर्णयामागे कोण होतं? खरंतर त्यामागे रश्मी ठाकरे आणि त्यांचा भावाचा हात होता. उद्धव ठाकरे यांचे निर्णय दोघे जण घेत होते'.

ठाकरे बंधूंच्या युतीच्या आम्हाला फरक पडणार नाही - नितेश राणे

मंत्री नितेश राणे यांचा दावा आहे की, 'महाराष्ट्रातील जनतेने २०२४ मध्ये आम्हाला मोठी साथ दिली. दोन्ही भाऊ एकत्र आले किंवा नाही, आम्हाला काय फरक पडणार आहे? मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मला माहीत आहे की, खरी बाब काय आहे?'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतभेदावरील चर्चेवरही नितेश राणे यांनी भाष्य केलं. नितेश राणे म्हणाले,'असं काही नाही. महायुतीत सर्वकाही सुरळीत आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार अनुभवी नेते आहेत. तिघांमध्ये चांगला ताळमेळ आहे. तिघांचं काम करण्याची स्वत:ची वेगळी पद्धत आहे. कॅबिनेटमध्ये चांगलं वातावरण आहे. सगळं चांगलं सुरु आहे. आम्हाला कोणताही त्रास नाही'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price Today : खुशखबर! दिवाळीपूर्वी सोने-चांदी झालं स्वस्त! ग्राहकांसाठी मोठा दिलासा, जाणून घ्या आजचा भाव

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Marathi Actress Prajakta : 'Gen Z च्या नावाखाली हि**, समलिंगी...'; अभिनेत्री प्राजक्तावर आक्षेपार्ह कमेंट, नेटकरी संतापले

Diwali Faral : ना तूप, ना तेल! तरीही चवीला स्वादिष्ट; दिवाळी फराळ बनवण्याची खास ट्रिक लगेच वाचा

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

SCROLL FOR NEXT