KDMC News Saam Digital
मुंबई/पुणे

KDMC News: सरकार कर्ज देतं पण जागा नाही, आम्ही जायंच कुठे, केडीएमसीच्या कारवाईविरोधात फेरीवाले आक्रमक

Sandeep Gawade

अभिजित देशमुख

KDMC News

एकीकडे शासन स्वनिधी योजनेतून व्यवसाय करण्यासाठी दहा हजार रुपये कर्ज देतेय, कर्ज घेऊन फेरीवाले व्यवसाय करतात मात्र महापालिका कारवाई करतेय. त्यामुळे आम्ही कर्ज कसं फेडायचं असा सवाल फेरीवाल्यांनी केला आहे. फेरीवाला धोरण राबवून आधी आमचे पूनर्वसन करा, अशी मागणी करत फेरीवाल्यांनी आज कल्याण डोंबिवली महापालिकेने फेरीवाल्याविरोधात सुरू केलेल्या कारवाईविरोधात डोंबिवली विभागीय कार्यालयावर मोर्चा काढून इंदिरा चौकात ठिय्या मांडला.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 2014 पासून फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होत नाही. फेरीवाल्यांची नोंदणी होऊनही, फेरीवाल्यांना शासनाच्या नियमानुसार कर्ज उपलब्ध करूनही फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यासाठी हक्काची जागा नाही. स्टेशन बाहेरील 150 मीटर परिसरात फेरीवाले बसले तर पालिकेडून कारवाई होते, असा आरोप कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे यांनी यावेळी केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तसेच दुसरीकडे नोंदणीकृत फेरीवाल्यांना बसण्यासाठी ठरवलेले धोरण फक्त कागदावरच आहे. नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठी लवकरच टाऊन वेडिंग कमिटी निर्णय घेईल असे अनेक वेळेला आश्वासन देण्यात आले. तसेच राजकीय पुढारी देखील फेरीवाल्यांच्या निर्णयाबाबत केवळ आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. जर महापालिका प्रशासनाने फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढला नाही तर लवकरच शेकडो महिला-पुरुष फेरीवाले पालिकेवर मोर्चा काढणार असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT