रुपाली बडवे
Political News Today: एखादा मंत्री असो वा एखादा खासदार,आमदार त्यांच्या अवती भवती तुम्हाला त्यांचे पीए किंवा पोलीस सुरक्षाकर्मी त्यांच्यासोबत दिसतात. दौऱ्यावर जाताना तर अनेकदा नेत्यांसोबत पीए आणि पोलीस पहायला मिळतातच आणि यामुळेच सर्वसामान्य नागरीकांना अनेकदा त्रास होताना पाहायला मिळालं आहे. (Latest Marathi News)
मात्र राज्यातील एक मंत्री मात्र याला अपवाद ठरत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे अतिशय विश्वासू अशी ओळख असलेले ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी कोणालाही सोबत न घेता मुंबई ते नांदेड (Nanded) आणि नांदेड ते मुंबई असा रेल्वेने एकट्यानी प्रवास केला. विशेष बाब म्हणजे गिरीश महाजन स्वतःच्या बॅगा स्वतः हातातून घेऊन जात होते. गिरीश महाजन यांना याबाबत विचारले असता मी आमदार असल्यापासूनच एकटा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याआधी सुरक्षाही नाकारली
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा देखील नाकारली होती.
पोलीस दलावर अतिरिक्त भार येऊ नये म्हणून यापूर्वीच मी वाय+ सुरक्षा नाकारली आहे आणि प्रवासात सुरक्षा व्यवस्था असली की प्रत्येक स्टेशनला 10 अतिरिक्त पोलीस बदलत राहतात. यामुळे नागरीकांना देखील त्रास होतो. त्यांची गैरसोय होते आणि पोलीस दलावरही भार वाढतो म्हणून गेली 30 वर्ष आमदार आणि मंत्री असतानाही एकट्याने प्रवास करतो अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.