neelam gorhe
neelam gorhe saam tv
मुंबई/पुणे

'भिंगरी' तल्या मुलाला देखील अशी मैत्री पटणार नाही; गो-हेंचा शेलारांवर पलटवार

रोहिदास गाडगे

राजगुरुनगर : कोल्ह्यास द्राक्ष आंबट म्हणतात ना तसे झाले आहे बघा. शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काॅंग्रेस (ncp) आली आणि भाजप (bjp) बरोबर गेली नाही त्याचं दुख दोन वर्ष झाले हे विसरले नाहीत. आजपर्यंत शिवसेनेने (shivsena) उघडपणे राजकारण केले आहे. भाजपने मात्र फसवणुकच केली. मैत्री आणि दातृत्वा फक्त एकतर्फी वागणुक दिली गेली असा टाेला शिवसेना नेत्या नीलम गो-हेंनी (neelam gorhe) भाजप नेते आशिष शेलार (ashish shelar) यांना लगावला आहे. गो-हे या राजगुरुनगर येथे महिला आघाडीच्या बैठकीस आल्या हाेत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (neelam gorhe latest marathi news)

सन २०१७ मध्येच राष्ट्रवादी (ncp) सोबत युतीची बोलणी झाली होती. मंत्रीपदंही ठरली या आशिष शेलार (ashish shelar) यांच्या गौप्यस्फोटचा विधानसभा उपसभापती नीलम गो-हेंनी (neelam gorhe) चांगलाच समाचार घेतला.

मैत्रीची संकल्पना घेऊन सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने शिवसेनेच्या जागा पाडल्याचा गंभीर आरोप करत अशा मैत्रीला भिंगरीतल्या मुलाला सुद्धा अशी मैत्री पटणार नाही असा पलटवार अशिष शेलारांवर गो-हेंनी केला.

भोंग्यावरुन राजकारण...!

राज्यात भोंग्यावरुन राजकारण सुरु असुन धर्माच्या नावाची ऍलर्जी असणारे आणि पक्ष स्थापनेपासुन भगवा नाकारुन ध्वज बदलणारी मनसे. आता या भुमिका पालटुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांचे कौतुक करतात. योगींच्या भुमिकेमुळे मंदिर आणि मशिदीवर बंधन आलेत याची विचार करण्याची गरज आहे असेही गाे-हेंनी नमूद केले.

अनेक पात्र पुढे येतील

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करणा-यांना केंद्र सरकार सुरक्षा पुरवत असल्याचा गंभीर आरोप गो-हेंनी केला. नारायण राणे, सोमय्या, राणावत, राणा दाम्पत्य यांनी केंद्राची सुरक्षा मिळविण्यासाठी उद्धव ठाकरेंवर टिका टिपणी सुरु केली आहे. महाराष्ट्राचे सामाजिक वातावरण स्थिराऊ द्यायचे नाही विकासाचा अजेंडा लोकांपर्यत पोहचु द्यायचा नाही. लोकांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठीचा एक एक व्यक्ती पुढे येऊन काम करतोय. पुढील काळात भाजपप्रणित असे अनेक पात्र पुढे येतील असा टाेला देखील गो-हेंनी मुख्यमंत्र्यांवर राेज टीका टिप्पणी करणा-यांना लगावला.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : मोदी देशाची अर्थव्यवस्था पहिल्या ३ अर्थ व्यवस्थेच्या क्रमांकावर आणणार- देवेंद्र फडणवीस

Exercise Tips: व्यायाम करण्याचा कंटाळा येतोय? या पद्धतीने करा व्यायाम,दिवसभर राहाल फ्रेश

Hemant Dhome News : "साहेब आपली क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना..."; हेमंत ढोमेची शरद पवारांसाठीची पोस्ट चर्चेत

T20 World Cup 2024 | टी-२० वर्ल्डकप सुरू होण्याआधीच धडकी भरवणारी बातमी! दहशतवादी हल्ल्याची धमकी

Nana Patole On Narendra Modi | अग्निवीर योजनेबद्दल नाना पटोले काय बोलले?

SCROLL FOR NEXT