पुदुच्चेरी : शालेय शिक्षण विभागाने कराईकल (Karaikal) आणि पुदुच्चेरी (Puducherry) येथील सर्व शासकीय आणि खाजगी शाळांना (schools) एक परिपत्रकाच्या माध्यमातून इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना (students) उत्तीर्ण घाेषित (students of classes 1 to 9 in puducherry declared all pass) केले आहे. (puducherry latest marathi news)
कोरोनाच्या (corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा नीट चालू शकत नव्हत्या. भयभीत असते वातावरण होते. दीड वर्षापासून ऑनलाइन धडे (online school) दिले जात हाेते. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाल्यानंतर चार फेब्रुवारीस शाळा पुन्हा सुरू झाल्या आणि विद्यार्थ्यांना थेट वर्गातून अभ्यास (offline school) करण्याची संधी मिळाली आहे.
दरम्यान शालेय शिक्षण विभागाचे सहयोगी संचालक व्ही. जी. शिवगामी (V G Shivgami) यांनी सर्व शाळांना नुकतेच एक परिपत्रक पाठविले आहे. त्यामध्ये कराईकल, पुदुच्चेरी येथील सर्व शासकीय अनुदानीत शाळांमधील इयत्ता पहिली ते नववीतील सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात येत आहे असे नमूद केले आहे. तसेच या वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी यांची यादी तयार करून ती पाठवावी असे म्हटले आहे.
दरम्यान विद्यार्थी यांची कमी उपस्थिती किंवा शुल्क न भरणे (पैसे न देणे) यासह कोणत्याही कारणास्तव त्यांचे प्राविण्य रोखले जाऊ नये. इयत्ता १ ते ९ (उद्या, ता. २९) या वर्षीचे शालेय दिवस संपतील. शाळेचा शेवटचा दिवस दहावीसाठी ३० मे आणि बारावीसाठी २९ मे राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.