- सिद्धेश म्हात्रे
नवी मुंबई : नवी मुंबईतील (navi mumbai) एपीएमसी बाजारपेठेत (apmc market) आज (गुरुवार) हापूस आंब्याची (mango) विक्रमी आवक झाली आहे. तब्बल एक लाखाहून अधिक आंब्याच्या पेट्यांची आवक झाली आहे अशी माहिती एपीएमसीचे संचालक संजय पानसरे (sanjay pansare) यांनी दिली. (apmc market latest marathi news)
पानसरे म्हणाले कोकणातील (kokan) ७६ हजार पेट्यांची तसेच कर्नाटकातील (karnatak) हापूस आंब्याची (alphonso mango) २५ हजार पेट्यांची आवक आज झाली आहे. आवक वाढल्याने आंब्याचे भाव ही कमी झालेत. एक हजार रुपयांपासून तीन हजारांपर्यंत एक पेटी आज नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये (घाऊक बाजारपेठेत) विकली जात आहे.
अक्षय तृतीया या सणास मुंबईकरांसाठी मुबलक आंबा उपलब्ध झाल्याचे पानसरेंनी नमूद केले. दरम्यान गतवर्षी सर्वात जास्त ६२ हजार पेट्यांची आवक झाली होती. यंदा ७६ हजार पेट्यांची आवक झाल्याने एक नवा विक्रम झाल्याची माहिती बाजार समितीतून देण्यात आली.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.