Ambarnath Municipal Council Saam Tv
मुंबई/पुणे

Ambarnath News: अंबरनाथ नगरपालिकेत १०० कोटींचा भ्रष्टाचार? शरद पवार गटाचा गंभीर आरोप; काय आहे प्रकरण?

अजय दुधाणे

Ambarnath Municipal Council Corruption News In Marathi:

एक मोठी बातमी समोर येत आहे. अंबरनाथ नगरपालिकेत तब्बल १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून कामं न करताच बिलं काढण्यात आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. महेश तपासे यांच्या या आरोपाने एकाच खळबळ माजली आहे.

महेश तपासे यांच्या आरोपावर आता अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. तपासे यांच्या आरोपावर बोलताना डॉ. प्रशांत रसाळ म्हणाले आहेत की, ''असे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू.'' नेमकं काय आहे हे प्रकरण आणि महेश तपासे यांनी पालिकेवर काय आरोप केले आहेत, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी अंबरनाथ नगरपालिकेत येऊन मुख्याधिकारी आणि अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अंबरनाथ नगरपालिकेत खोटी कामं दाखवून खोटी बिलं काढली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अशाप्रकारे अंबरनाथ पालिकेत आत्तापर्यंत तब्बल १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला.

याबाबत काही कामांची खोटी बिलं देखील त्यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना दाखवली. तसंच प्रत्यक्षात ही काम झालेलीच नसल्याचा दावाही त्यांनी केला. या सगळ्याबाबत पालिका प्रशासनाने लवकरात लवकर भूमिका घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा इशारा महेश तपासे यांनी दिला.

यावर मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी चौकशीचे आदेश दिले असून जे अधिकारी यात दोषी आढळतील, त्यांच्यावर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी प्रतिक्रिया रसाळ यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT