Pune News: Saamtv
मुंबई/पुणे

Pune News: 'आठवडाभर पुण्यात मुक्कामी राहा...', शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रपतींना निमंत्रण; कारण काय?

Pune News: दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींचे आभार व्यक्त केले.

Gangappa Pujari

सागर आव्हाड, पुणे|ता. २२ सप्टेंबर

NCP Sharad Pawar Group Letter To President: पुणे शहरातील खड्डेमय रस्ते सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. पुण्यातील खड्ड्यांवरुन राजकारण तापण्याचे महत्वाचे कारण म्हणजे पुण्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांचा थेट देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनाही मोठा फटका बसला. मुर्मूना पुणे दौऱ्या खड्ड्यांचा मोठा त्रास झाला, ज्यावरुन राष्ट्रपती भवनाने पुणे पालिकेला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे. यावरुनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून आठवडाभर पुणे मुक्कामी राहा, असे पत्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहले आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात शहरातील खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागला. यानंतर राष्ट्रपती भवनाने पुणे पोलिसांना कर्मवीर पत्र लिहून खड्ड्यांबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींना एक आठवड्यासाठी पुणे मुक्कामाचे निमंत्रण दिले आहे. दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यात आपल्याला शहरातील खड्ड्यांचा प्रत्यय आला, याची दखल घेत आपण प्रशासनास आवश्यक सूचना दिल्या याबद्दल आपले तमाम पुणेकरांच्या वतीने प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींचे आभार व्यक्त केले.

पुणेकर नागरिक आपल्या दैनंदिन जीवनात असंख्य यातना भोगत आहेत. रस्त्यांची दुरावस्था, वाहतूक कोंडी, टेकड्यांची फोडाफोडी याने पुण्याचा श्वास गुदमरतोय, अपघातांच्या भीतीने प्रत्येक पुणेकर जीव मुठीत घेऊन फिरतोय, मुळा - मुठा नदीला प्रदूषणाचा विळखा, एका पावसात तुंबणारे रस्ते, दिवसाढवळ्या पुण्यातील रस्त्यांवर होणारे खून - दरोडे अशा अवस्थेत पुणेकर जगत आहेत.

गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेले सत्ताधारी जनतेच्या वेदनांकडे लक्ष देण्यास तयार नाही. म्हणूनच, पुणेकरांच्या या वेदना अनुभवण्यासाठी राष्ट्रपतींनी आठ दिवस पुण्यात मुक्काम करावे अशी विनंती प्रशांत जगताप यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून केली आहे. दरम्यान, प्रशांत जगताप यांच्या या पत्राची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT