NCP Reshuffle Saam Tv
मुंबई/पुणे

NCP: मोठी बातमी! राष्ट्रवादीमध्ये मोठे फेरबदल, मुंबई अध्यक्षपदी 'या' युवा नेत्याची वर्णी

NCP Reshuffle: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठे फेरबदल झाले आहेत. मुंबईत अध्यक्षपदी आणि राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी युवा नेत्यांची नियुक्ती करण्यात आली.

Priya More
  • अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दिकी यांची नियुक्ती

  • उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी निवड

  • पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दिले नियुक्तीपत्र

राज्यात विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू असताना एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पार्थ पवार यांनी मुंबईतील एका युवा नेत्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी झिशान सिदिक्की यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फेरबदलावर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून रिक्त पदांवर नियुक्त्या करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून आमदार झिशान सिद्दिकी यांची मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस नेते उमेश पाटील यांची राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते पार्थ पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झिशान सिद्दिकी आणि उमेश पाटील यांनी नियुक्ती पत्र देण्यात आले.

झिशान सिद्दिकी हे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचं पुत्र आहेत. त्यांनी २०१९ मध्ये काँग्रेसकडून वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी होत ते आमदार झाले होते. त्यांनी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपद देखील सांभाळले होते. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पण शिवेसेना नेते वरुण सरदेसाई यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेवर पाठवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ChatGPT scam : चॅटजीपीटीच्या मदतीने एसी लोकलचा बनावट पास तयार! विरारच्या प्रवाशाचा हायटेक प्रताप उघड

Water Cut: पनवेलकरांसाठी महत्वाची बातमी, ३६ तास पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या परिसरांना बसणार फटका?

Maharashtra News Live Update: रांजणगाव गणपती परिसरात भीषण अपघात

Shaktipeeth Highway: राज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध; सत्ताधारी आमदारानेच घेतली विरोधाची भूमिका

Vande Bharat Train: आधी इडली अन् मेदुवडा, आता खा पुरणपोळी, 'वंदे भारत'च्या प्रवासादरम्यान मराठमोळ्या चवीची मेजवानी

SCROLL FOR NEXT