Ajit Pawar Pink Jacket: Saam Tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar Pink Jacket: विधानसभेआधी दादांची 'गुलाबी' रणनिती? अजित पवारांनी गुलाबी जॅकेट का शिवलं?

Ajit Pawar News: निवडणुकांमध्ये यश मिळावं म्हणून उमेदवार अनेक प्रकारची रणनीती आखतात. कोणी मंदिरात जाऊन देवाला साकडं घालतं तर कोणी मतदारांना खूश करण्यासाठी योजनांची घोषणा करतं. मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता चक्क गुलाबी रंगावर जोर दिल्याचं पाहायला मिळतंय.

Tanmay Tillu

विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने अजित पवार गटाने मोर्चेबांधणी आणि रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. अजित पवार गटाकडून त्यांच्या कार्यक्रमांमध्ये, बॅनर्सवर, जाहिराती आणि व्यासपीठावर गुलाबी रंगाचा अधिकाअधिक वापर केला जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीये.

त्यात अजित पवारांनीही गुलाबी जॅकेट्स घालण्यास सुरुवात केलीये. त्यासाठी खास 12 गुलाबी जॅकेट्स शिवल्याचं कळतंय. याशिवाय, अजित पवार यांनी कुर्ता आणि जॅकेटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह लावण्यासही सुरुवात केलीय.

तर यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी अजित पवारांना टोला लगावला. गुलाबी स्वप्न दाखवण्यापेक्षा काळं भविष्य बदला, असा टोला अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांना लगावला आहे.

लोकसभा निवडणूकीत अवघा 1 खासदार निवडून आल्यानंतर अजित पवार गटानं पक्षाच्या प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलंय. या कंपनीच्या सल्ल्यानुसारच अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या सर्व आमदारांना घेऊन सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची चर्चा होती. यानंतर या कंपनीच्या सल्ल्यानुसारच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी गुलाबी रंगाचा जास्तीत जास्त वापर केला जाणार असल्याचं समजतंय.

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे आता या योजनेला गुलाबी रंगाची जोड देऊन अजितदादा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जातंय. मात्र आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये गुलाबी रंग अजितदादांना किती फळणार याची उत्सुकता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

IND vs AUS : पहिल्या सामन्यात मार्नस लाबुशेनकडून चिटींग? मोहम्मद सिराज संतापला, वादात कोहलीचीही उडी, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

VIDEO : अब की बार कुणाचं सरकार? काही मिनिटांत मतमोजणीला सुरुवात

National Cashew Day: जागतिक काजू दिवसाचा इतिहास, महत्व आणि साजरा करण्याच्या पद्धती

SCROLL FOR NEXT