Hasan Mushriff Saam TV
मुंबई/पुणे

Maratha Aarakshan : मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली, आमदार निवासाबाहेरील घटनेने पोलिसांची धावपळ

Hasan Mushrif Car Vandalised : हसन मुश्रीफ यांची कार आकाशवाणी आमदार निवासाबाहेर उभी होती.

सूरज सावंत

Mumbai News :

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाहनाची मराठा आंदोलकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईत मराठा आरक्षणासाठी आक्रमक मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

हसन मुश्रीफ यांची कार आकाशवाणी आमदार निवासाबाहेर उभी होती. त्यांनी अचानक आलेल्या काही जणांनी हसन मुश्रीफ यांच्या कारवर हल्ला चढवला. कारच्या काचा फोडल्या आहेत. मरीन ड्राइव्ह पोलीसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

या घटनेनंतर मंत्रालय आणि आसपासच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हसन मुश्रीफांच्या कोल्हापूरमधील निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हसन मुश्रीफ यांनी वाहनावरील हल्ल्यानंतर म्हटलं की, मी सुरक्षित आहे. घटना घडली त्यावेळी मी तिथे नव्हतो. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्या भावना मी समजू शकतो. मी स्वतः गृह खात्याला फोन करुन त्यांच्यावर कारवाई करू नका, असं सांगणार आहे.

मात्र मंत्र्यांची घरे जाळणे, गाड्या फोडणे अत्यंत गंभीर आहे. यामुळे आंदोलनाला गालबोट लागत आहे. मराठा समाज हा आमचाच समाज आहे. आरक्षण मिळेपर्यंत आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी राहणार आहोत, असं ही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

सध्या ठराविक दोन ते तीन व्यक्ती ठरवून आमदार आणि खासदारांना फोन करत आहेत. त्याची ऑडिओ क्लिप व्हायरल करत आहेत. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आमच्या सर्व आमदारांची एक दिवशीय अधिवेशनाची मागणी आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT