Maratha Reservation Andolan : मराठा आंदोलनाचा शेतकऱ्यांना फटका, दिवाळीच्या तोंडावर मोठं नुकसान

Farmers Loss due to Maratha Andolan : बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकरी संकटात सापडला आहे.
Maratha Reservation Andolan Farmers loss by Maratha protest beed news
Maratha Reservation Andolan Farmers loss by Maratha protest beed news saam TV
Published On

Beed News :

मागील ३-४ दिवसांपासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या आंदोलनाचा फटका शेतकऱ्यांनाही बसताना दिसत आहे.

बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शेतकरी संकटात सापडला आहे. आडत मार्केटवरील तब्बल 75 टक्के भाजीपाला कमी झालाय. तर ज्या शेतकऱ्यांनी आडतवर भाजीपाला आणलाय, त्या शेतकऱ्यांचा भाजीपाला अक्षरशा कवडीमोल भावात विकला जात आहे.  

Maratha Reservation Andolan Farmers loss by Maratha protest beed news
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना पोलीस उचलणार असल्याची अफवा; हजारो तरुणांची अंतरवाली सराटीत धाव, परिसरात शांतता

मेथीची भाजी 700 ते 800 रुपये शेकडा जात होती. तिला 100 ते 150 रुपये भाव मिळालाय. त्यामुळे शेतकरी अजूनच संकटात सापडला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीत तळहाताच्या फोडासारखा भाजीपाला जपला. मात्र आता त्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी निराशा झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एका शेतकऱ्यांना सांगितलं की, मेथी काढायला मला 900 रुपये खर्च आला आणि आता 900 रुपयांमध्येच मेथी विकली आहे. त्यामुळे बी बियाणे, पेट्रोलचा खर्च नेमका कुठून येणार? ऐन दिवाळीच्या तोंडावर या आंदोलनामुळे आम्हाला मोठा फटका बसला. यामुळे आमच्यापुढे जगाव कसं? असा प्रश्न निर्माण झालाय. आता दिवाळी आम्ही कशी साजरी करावी, असा प्रश्न देखील आमच्यापुढे उभा राहिलाय.

Maratha Reservation Andolan Farmers loss by Maratha protest beed news
Mumbai Crime News : मानखुर्दमध्ये 32 वर्षीय महिला पोलीस कॉन्स्टेबलची आत्महत्या, सुसाईड नोटही सापडली

बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण

मराठा आंदोलनाला बीडमध्ये सर्वाधिक हिंसक वळण लागलं. सोमवारी मराठा आंदोलकांनी आक्रमक होत जिल्ह्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या बंगल्यांना लक्ष्य केलं. अनेक नेत्यांच्या गाड्या पेटवल्या. रस्त्यांवर टायर जाळून वाहतूक ठप्प करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने बीडमध्ये संचारबंदीची आदेश लागू केले आहेत. इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com