Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Saam TV
मुंबई/पुणे

आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का; राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांवर हल्लाबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात नवे सरकार सत्तेत येऊन एक महिना पूर्ण झाला. मंत्रिमंडळाचा विस्तारही काल झाला. सरकार सत्तेत येताच अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरे कारशेडचा प्रश्न मार्गी लावत पुन्हा काम सुरू केले आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एसटी कामगारांचा राजकारणासाठी वापर केला, त्यांच्या विलिनीकरणाचा सोयीने विसर पडला, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला.

'अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि आरे कारशेडच्या फाईल देवेंद्र फडणवीसांनी लगेच पास केल्या. पण ज्या एसटी महामंडळ कामगारांचा राजकारणासाठी वापर केला त्यांच्या विलिनीकरणाचा सोयीने विसर पाडला! एसटी कर्मचाऱ्यांच्या साधेपणाचा फायदा घेऊन आकांडतांडव करणारे "नागोबा" आता शांत का आहेत., असं ट्विट आमदार अमोट मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसापासून शिंदे-फडणवीस सरकारवर मंत्रिमंडळ विस्तारावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता खाते वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अखेर शिंदे सरकारचा खातेवाटपाचा मुहूर्त ठरला; महसूल, गृह खातं कुणाला?

आज गुरुवार संध्याकाळपर्यंत खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठका सुरू असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीस महसूल खात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे.

शिंदे गटही महसूल खात्यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर काही खात्यावर अजुनही तिढा कायम असून, आज दुपारपर्यत हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. हा तिढा आज सुटला तर सायंकाळपर्यंत खातेवाटप होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Maharashtra politics: भुजबळ सीएम झाले असते, पक्ष फूटला असता; शरद पवारांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

SCROLL FOR NEXT