महाविकास आघाडीच्या फुटीचे संकेत; नाना पटोलेंनी व्यक्त केली राष्ट्रवादी, शिवसेनेवर नाराजी

एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची भूमिका काँग्रेसची नाही - पटोले
Nana Patole On MVA
Nana Patole On MVASaam TV

औरंगाबाद: विधानपरिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीवरुन आता महाविकास आघाडीमध्ये फुट पडल्याचं दिसतं आहे. महाविकासआघाडी ही काही नैसर्गिक आघाडी नाही तर तो केवळ विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला निर्णय असल्याचं वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज माध्यमांशी बोलताना केलं आहे.

पटोले म्हणाले, विधानसभेत राष्ट्रवादीचा (NCP) विरोधी पक्षनेता झाला, विधान परिषद नेता आम्हाला हवा होता बसून निर्णय घेता आला असता, मात्र आम्हाला त्यांनी कळवलं नाही आणि नेता निवडला. हे आम्हाला साधं विचारायला तयार नाहीत. आमच्याशी बोलायला तयार नाहीत.

आमची आघाडी विपरीत परिस्थीती मध्ये झाली होती आमची नैसर्गिक आगाडी नाही हे सत्य आहे. असं म्हणत पटोले यांनी महाविकास आघाडीबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर (Shivsena) नाराजी व्यक्त करत आपला रोष व्यक्त केला आहे.

ते पुढे म्हणाले आम्ही विरोधीपक्षात बसणार होतो. जनतेच्या हितासाठी विपरीत परिस्थित आम्ही आघाडीत गेलो. तसंच आम्ही तुमच्याकडे सत्ता मागायला आलो नव्हतो, तुम्ही आमच्याकडे आला होतात हे लक्षात ठेवावे.

आम्ही पाठीवर वार करत नाही -

Nana Patole On MVA
अखेर शिंदे सरकारचा खातेवाटपाचा मुहूर्त ठरला; महसूल, गृह खातं कुणाला?

येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीने लढावे की नाही याबाबतचा निर्णय कार्यकर्ते घेतील, आम्ही दोस्ती करतो पाठीवर वार नाही. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची भूमिका काँग्रेसची नाही असं म्हणत त्यांनी मित्र पक्षांना टोला लगावला.

तर दुसरीकडे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भेट घेतली या भेटीत ठाकरे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आघडी करण्याबाबत तत्वता मान्य केल्याचं सांगितलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com