Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharahstra Politics: एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला भाजपचाच विरोध होता, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय. पवारांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावर मोठं भाष्य केलंय. त्यावरचा हा रिपोर्ट.
Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ
Maharahstra PoliticsSaam Tv

भरत मोहोळकर, साम प्रतिनिधी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाला भाजपचाच विरोध होता, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केलाय. राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी मविआच्या सत्तास्थापनेदरम्या झालेल्या घडामोडींवरही मोठे दावे केले आहेत. मात्र पवारांनीही शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदावर मोठं भाष्य केलंय. त्यावरचा हा रिपोर्ट.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान होणं हे सगळ्यांसाठी अनपेक्षित धक्का होता. कारण शिवसेनेत फूट पडल्यानंतर भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठीच शिंदेंच्या नेतृत्त्वातली शिवसेना उदयाला आल्याचं सर्वांना वाटत होतं. मात्र भाजपनं धक्कातंत्र अवलंबत शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनं केलं. परंतू त्यांच्या मुख्यमंत्री होण्याला राज्यातील भाजप नेत्यांचा विरोध होता असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. तर राऊतांचा हा दावा शिंदे गटानं फेटाळून लावलाय.

संजय राऊतांनी 2019 मध्ये मविआ सरकारच्या स्थापनेदरम्यानच्या घडामोडींबाबतही नवा खुलासा केलाय. मविआ सरकारचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार होतं. मात्र राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या विरोध असल्याचा दावा राऊतांनी केलाय.

पवारांनी मात्र याबाबत वेगळाच खुलासा केलाय. शिंदेंच्या नावाबाबत शिवसेनेत अंतर्गत चर्चा झाली असेल. मात्र आम्हाला त्याची कल्पना नव्हती. तसंच शिंदेंच्या नावाबाबत राष्ट्रवादीची काहीही तक्रार नसल्याचा दावा त्यांनी केलाय. ऐन मतदानाच्या अखेरच्या टप्प्यापूर्वी राऊत आणि पवारांच्या दाव्यांमुळे पुन्हा मुख्यमंत्रिपदाचा मुद्दा तापलाय. शिंदे मुख्यमंत्री होऊन आता दोन वर्षे उलटून गेलीत. मात्र बदलेल्या राजकीय समीकरणांवरची चर्चा काही संपायला तयार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com