Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Sharad Pawar Vs Ajit Pawar : निवडणुकीच्या जाहीर सभांमध्ये टार्गेट करणा-या अजित पवारांना शरद पवारांनी पहिल्यांदाच खडे बोल सुनावले आहेत. सुप्रियाला फक्त खासदार केलं तर अजित पवारांना कायम सत्तापदं दिली अशा शब्दांत पवारांनी अजितदादांना सुनावलं.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

निवडणुकीच्या जाहीरसंभामध्ये टार्गेट करणा-या अजित पवारांना शरद पवारांनी पहिल्यांदाच खडे बोल सुनावले आहेत. सुप्रियाला फक्त खासदार केलं तर अजित पवारांना कायम सत्तापदं दिली अशा शब्दांत पवारांनी अजितदादांना सुनावलं. पवारांनी अजितदादांच्या राजकीय जीवनाचा मांडेलेल्या हिशोबावरचा हा रिपोर्ट.

ऐकलत, अजित पवारांनी शरद पवारांवर केलेला हा गंभीर आरोप. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी अनेक आरोप केले. मात्र शरद पवारांनी या आरोपांना थेट उत्तर देणं टाळलं. ऐवढंच नव्हे तर बारामती लोकसभेच्या प्रचारसभेत केलल्या या गंभीर आरोपालाही बारामतीचं मतदान होईपर्यंत शरद पवारांनी कुठलंही उत्तर दिलं नाही. मात्र अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी शरद पवारांनी अजितदादांना खडे बोल सुनावले आहेत.

बारामती लोकसभेच्या मैदानात दोन्ही पवार आमनेसामने उभे ठाकल्यानंतर अजित पवारांनी जाहीरसभांमध्ये आपल्या आरोपांची धार आणखीनच तीव्र केली. आपण साहेबांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आपल्याला संधी मिळाली असती आणि आपल्यावर अन्याय झाला नसता असा थेट आरोप अजित पवारांनी शरद पवारांवर केला. नेमकं काय म्हटले अजित पवार पाहूयात.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : भाजपसोबत जाण्याचा कधी आणि का घेतला निर्णय?; प्रफुल पटेलांचा पुन्हा गौप्यस्फोट

2004 मध्ये राष्ट्रवादीनं सर्वात जास्त जागा जिंकूनही मुख्यमंत्रिपद का घेतलं नाही असा आरोप अजित पवार सातत्यानं करत असतात. तर त्यांचे कार्यकर्ते साहेबांनी अन्याय केल्यामुळेच 2004 साली अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत असा आरोप करत असतात. त्यालाही शरद पवारांनी काय उत्तर दिलंय. पाहूयात.

लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यान अजित पवारांनी शरद पवारांवर अनेक गंभीर आरोप केले. मात्र पवारांनी प्रतिष्ठेच्या बारातमीच्या लढाईतही त्यांना थेट उत्तर देणं टाळलं. पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीचा पटच मांडलाय. ताई-दादात कधी भेद न केल्याचा दावा करत सुप्रिया सुळेंपेक्षा अजित पवारांनाच झुकतं माप दिल्याचा हिशोबच पवारांनी दिला. राजकारणात टायमिंगला महत्त्व असतं. त्यामुळे निवडणूक संपताना हे सांगून पवारांनी कुठलं टायमिंग साधलं याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलंय.

Maharashtra Politics 2024
Sharad Pawar News: '...म्हणून २००४ मध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी सोडली'; छगन भुजबळांचे नाव घेत शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com