maharashtra political News  saam tv
मुंबई/पुणे

Thackeray-Ambedkar: बैठकीत काय झालं? उद्धव ठाकरेंनी सांगितलं, तर अजितदादांनीही मोठ्या आवाजात दिला पाठिंबा

काँग्रेस राष्ट्रवादी याबाबत सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

रश्मी पुराणिक

Ajit Pawar News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीबाबत बैठक झाली. मुंबईतील हॉटेल ग्रँड हयातमध्ये दोन पक्षांच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची चर्चा झाली. या युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी याबाबत सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. (Latest Marathi News)

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज, सोमवारी पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे भीमशक्ती-शिवशक्ती प्रयोगावर भाष्य करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, प्रकाश आंबेडकर आणि माझ्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्या युतीबाबत जे बारकावे आहेत, ते लवकरात लवकर संपवू. कारण पुढे जाऊन काही अडता कामा नये. त्यामुळे पुढे जाऊन आमची युती किंवा एकत्र येणे असेन, ते आम्ही जाहीर करू'.

'प्रकाश आंबेडकरांची महाविकास आघाडीत येण्याची मानसिकता आहे. त्यांचे काही विषय आहेत, ते जटील नाहीत. त्यामुळे ते लवकर संपवू. आम्ही देखील एकत्र येण्यासाठी दोनदा-चारदा एकत्र बसलो. त्यानंतर आम्ही एकत्र आलो. केवळ सत्ता स्थापन्यासाठी एकत्र आलो नाही. गद्दारीनंतरही आम्ही एकजुटीचं दर्शन घडवत आहोत, असेही ठाकरे पुढे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देखील ठाकरे आणि आंबेडकर यांच्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली. 'या युतीवर काँग्रेस राष्ट्रवादी याबाबत सकारात्मक असल्याचे अजित पवार यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT